पंतप्रधान नरेंद्र मोदी चार राज्याच्या भेटीला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ जुलै २०२३ ।  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच परदेश दौऱ्यावरून आले असता आता ते उद्यापासून ७ आणि ८ जुलै रोजी चार राज्यांना भेट देणार आहेत. यावेळी ते सुमारे 50,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. ते 7 जुलै रोजी छत्तीसगड आणि उत्तर प्रदेश राज्याला भेट देणार आहेत. तर 8 जुलै रोजी पंतप्रधान तेलंगणा आणि राजस्थानला भेट देणार आहेत. या ठिकाणी ते विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत.

7 जुलैला म्हणजे उद्या सकाळी 10:45 च्या सुमाराला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रायपूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमात विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण होईल. उत्तर प्रदेशमधील गोरखपूर इथं दुपारी 2:30 च्या सुमाराला पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात सहभागी होतील. त्यानंतर ते गोरखपूर रेल्वे स्थानकावर वंदे भारत रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर, संध्याकाळी 5 च्या सुमारास, वाराणसी येथे पंतप्रधानांचे आगमन होईल. तिथे ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी, उद्घाटन आणि राष्ट्रार्पण करतील.

दिनांक 8 जुलै रोजी सकाळी 10:45 वाजता, तेलंगणा राज्यातील वरंगल येथे पंतप्रधानांचे आगमन होणार असून ते एका सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहतील. या कार्यक्रमात ते विविध प्रकल्पांची पायाभरणी करतील. पंतप्रधानांचे दुपारी 4:15 च्या सुमारास बिकानेर येथे आगमन होईल. तिथे ते राजस्थानमधील विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि राष्ट्रार्पण करतील.
पंतप्रधान रायपूरमध्ये सुमारे 7500 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. पायाभूत सुविधांच्या विकासाला चालना देण्यासाठी,पंतप्रधान छत्तीसगडमधील पाच राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी करणार आहेत. तसेच गीता प्रेस गोरखपूरच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभात पंतप्रधान सहभागी होणार आहेत. गोरखपूर – लखनौ आणि जोधपूर – अहमदाबाद (साबरमती) यांना जोडणाऱ्या दोन वंदे भारत रेल्वेगाड्यांना पंतप्रधान हिरवा झेंडा दाखवणार आहेत. तसेच त्यांच्या हस्ते गोरखपूर रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाची पायाभरणी केली जाणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम