अपात्रता तरतुदींचे पालन करूनच कारवाई : नार्वेकर
बातमीदार | २ ऑक्टोबर २०२३
संविधानातील तरतुदींचे पालन करूनच अपात्रतेची कारवाई करण्यात येईल. तसेच, महाराष्ट्र अपात्रता अधिनियम १९८६ च्या नियमांचे तंतोतंत पालन करूनच आमदार अपात्रतेबाबतचा निर्णय घेणार आहे, असे विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांनी रविवारी स्पष्ट केले.
अॅड. नार्वेकर यांनी आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यावर ठाकरे गटाने आक्षेप घेत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नार्वेकर यांनी ही भूमिका मांडली. ते म्हणाले, ज्या लोकांना नियम समजत नाहीत, ज्यांना संविधानातील तरतुदींची माहिती नाही, त्यांनी केलेल्या आरोपांकडे मी लक्ष देत नाही. माझ्यावर कोणत्याही प्रकारचा दबाव पडू शकत नाही आणि पडणारही नाही.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम