७० व्या वर्षी विचारवंत प्रा.नरके यांचे निधन !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ९ ऑगस्ट २०२३ | समता परिषदेचे उपाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत प्रा.हरी नरके यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. मुंबईतील रुग्णालयात त्यांचे निधन झाले. हरी रामचंद्र नरके यांचा जन्म १ जून, १९६३ ला झाला होता. आज त्यांनी वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

मुंबईतील एशिअन हार्ट रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती.

प्रा. हरी नरके यांनी विपुल लेखन केले आहे. महात्मा फुले-शोधाच्या नव्या वाटा, महात्मा फुले यांची बदनामी : एक सत्यशोधन, हे त्यांचे पुस्तके प्रसिद्ध आहे. फेब्रुवारी २०११ पासून ते ब्लॉग लिहितात. सोशल मीडियावर ते सतत सक्रीय होते. अनेक सामाजिक विषयांवर ते थेट भाष्य करत असतं. हरी नरके यांनी मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या गटाला आपल्या ब्लॉगमधून आधार दिला होता. त्यांचे अनेक लेख काही वर्तमानपत्रांतही प्रसिद्ध झाले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम