पुनर्वसित गावांना सुविधा उपलब्ध करा :आ.एकनाथराव खडसे यांची विधानपरिषदमध्ये मागणी

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ जुलै २०२३ । जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गावांना नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत आ.एकनाथराव खडसे यांनी विधानपरिषद सभागृहात तारांकित प्रश्न मांडला. यावेळी आ. एकनाथराव खडसे म्हणाले जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणामुळे पुनर्वसित झालेल्या १८ गावातील नागरी सुविधा अपूर्णावस्थेत असून नवीन कामांचे प्रस्ताव शासनाकडे प्राप्त झाले असून उर्वरित कामांकरिता आवश्यक असलेल्या रुपये १३.३२ कोटींचा निधी प्रकल्प यंत्रणेकडून परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरही वितरीत करण्यात आला नाही, असे असल्यास, हतनूर प्रकल्पांतर्गत पुनर्वसनाच्या नवीन कामांना तत्काळ मंजुरी देऊन पूर्ण झालेल्या कामांचा उर्वरित निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच मांगलवाडी (ता.रावेर, जि.जळगाव) गावाचे विशेष बाब म्हणून हतनूर प्रकल्पांतर्गत पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे.

तसेच तांदलवाडी (ता.रावेर, जि.जळगाव) येथील प्रकल्पग्रस्तांनी रहिवासासाठी भूखंड मिळावा म्हणून दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी हतनूर जलाशयात केलेल्या जलसमाधी आंदोलनाचे वेळी प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाची कार्यवाही दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात येऊनही अद्यापपावेतो प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्यात आलेले नाही, असे असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय, चौकशीच्या अनुषंगाने हतनूर प्रकल्पग्रस्त व तांदलवाडी येथील रहिवाशांना भूखंड देण्यासह प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करून नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे, याला मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले हतनूर धरणामुळे पुनर्वसित झालेल्या गावातील नागरी सुविधा कामांकरिता प्राप्त निधी मागणी प्रस्तावाच्या अनुषंगाने शासन पत्र दिनांक ८ मार्च २०२३ व स्मरणपत्र दिनांक ३ जुलै २०२३ अन्वये त्रुटी पूर्तता करण्याबाबत विभागीय आयुक्त, नाशिक यांना कळविण्यात आले आहे. मौजे मांगलवाडी (ता.रावेर, जि.जळगाव) या गावाच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहे. तांदलवाडी (ता.रावेर, जि.जळगाव) येथील प्रकल्पग्रस्तांनी रहिवासासाठी भूखंड मिळावा म्हणून दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजी हतनूर जलाशयात केलेल्या जलसमाधी आंदोलनाचे वेळी प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाची कार्यवाही दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत पूर्ण करण्यात येईल असे दिनांक १ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या पत्रानुसार कळविण्यात येऊनही अद्यापपावेतो प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटप करण्यात आलेले नाही.  तांदलवाडी येथील प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपकामी दिनांक १३/०४/२०२३ रोजी सोडत आयोजित करण्यात आली होती. परंतु लाभार्थ्यांच्या यादीबाबत ग्रामस्थांनी हरकत घेतल्याने तांदलवाडी येथील अभिन्यासात भूखंड वाढवून सुधारित अभिन्यास मंजूर करण्यासाठी सहायक संचालक नगररचना जळगाव यांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिनांक १३/०४/२०२३ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आले होते. त्यानुसार सहायक संचालक नगररचना जळगाव यांनी दिनांक ०६/०७/२०२३ रोजीच्या पत्रान्वये सुधारित अभिन्यास सादर केला असून त्यानुसार भूखंडनिहाय प्रत्यक्ष सीमांकन करून प्रकल्पग्रस्तांना भूखंड वाटपाची कार्यावाही प्रस्तावित आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम