काळाची गरज लक्षात घेत एक पाऊल पुढे नामांकित इन्स्टिटयूट च्या माध्यमातून” प्रताप पॅटर्न” सुरु

बातमी शेअर करा...

अमळनेर(प्रतिनिधी ) -येथील खान्देश शिक्षण मंडळाच्या प्रताप महाविद्यालयाने महाराष्ट्रात नावलौकिक मिळविले असताना आता काळाची गरज लक्षात घेत एक पाऊल पुढे टाकले असून यामाध्यमातून प्रताप पॅटर्न अमळनेर ची मुहूर्तमेढ केली आहे,यामुळे विद्यार्थ्यांचा आय. आय. टी. चा संघर्ष असो,इंजिनिअरिंगला जायचे असो वा मेडीकल ची तयारी असो गरज नाही यासाठी कोटा-मुंबई-पुणे लातूरला जाण्याची पीडा कमी होणार आहे.
यासाठी प्रताप महाविद्यालयाने नामांकित क्वांटम इन्स्टिट्यूटला महाविद्यालयाशी जोडले असून येत्या 1 जुलै 2022 पासून प्रताप महाविद्यालयात अभियांत्रिकी व वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठीचे पूर्व तयारी वर्ग ऑफलाईन पद्धतीने सुरू होणार आहेत.सदर प्रताप पॅटर्न ची संपूर्ण माहिती देण्यासाठी खा शि मंडळाच्या कार्यालयात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते,यावेळी खा शि मंडळाचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी,कार्योपाध्यक्ष योगेश मुंदडा,संचालक डॉ अनिल शिंदे,विनोदभैय्या पाटील,नीरज अग्रवाल, प्रदीप अग्रवाल,डॉ संदेश गुजराथी,उपाध्यक्ष सौ माधुरी पाटील,विश्वस्थ सौ वसुंधरा लांडगे,चिटणीस प्रा ए. बी. जैन,प्राचार्य डॉ पी आर शिरोडे व क्वांटम इन्स्टिट्यूट आयआयटी, जेईई मेडिकल फाऊंडेशन चे प्राध्यापक वृंद उपस्थित होते.यावेळी उपस्थितांनी मनोगत व्यक्त करून या पॅटर्न बाबत सविस्तर माहिती दिली.

गोरगरीब गुणी विद्यार्थ्यांसाठी निर्णय-हरी वाणी

संस्थेचे कार्याध्यक्ष हरी भिका वाणी यांनी माहिती देताना सांगितले की आपल्या परिसरातील गोरगरीब व गुणी विद्यार्थ्यांना आपल्या गावातच जेईई आणि नीट चे धडे घेण्यात यावे यासाठी आम्ही प्रताप पॅटर्न सुरुवात करीत आहोत,आपल्या कडील अनेक विद्यार्थी मेडिकल,आयआयटी इंजिनिअरिंग साठी मोठा खर्च करून कोटा,लातूर येथे जाऊन शिक्षण घेतात,त्यासाठी आम्ही शिरपूर परिसरात नावलौकिक मिळविलेल्या कोटा येथीलच असलेल्या नामांकित इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून “प्रताप पॅटर्न”सुरू करीत असुन याचा विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम