मोठी बातमी : शरद पवारांच्या पत्नी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ जुलै २०२३ ।  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना आज मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असून शरद पवार रुग्णालयात पोहोचले आहेत.

प्रतिभा पवार यांच्यावर नेमकी कोणती शस्त्रक्रिया होणार आहे, याबद्दल माहिती कळू शकलेली नाही. ‘एएनआय’ने दिलेल्या माहितीनुसार त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल केले असून शरद पवार हेदेखील रुग्णालयात पोहोचले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम