
मोठा भांडाफोड! भावाला पोलीस करण्यासाठी उपनिरीक्षकच बसला परीक्षेला; ९ वर्षांनी खरं सत्य बाहेर
पोलीसांची गुप्त चाचपणी यशस्वी – धक्कादायक तथ्य समोर
दै. बातमीदार | ३ डिसेंबर २०२५ | पुण्यातून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्वतःचा सख्खा भाऊ पोलीस सेवेत यावा म्हणून एका उपनिरीक्षकानेच त्याच्या जागी लेखी परीक्षा दिल्याचा थरकाप उडवणारा प्रकार ९ वर्षांनी समोर आला आहे. या गंभीर गैरप्रकारात सहभागी असलेल्या उपनिरीक्षकाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला ३ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
कोण आहे आरोपी?
अटक झालेल्या अधिकाऱ्याचे नाव सुप्पडसिंग शिवलाल गुसिंगे आहे. तर त्याचा भाऊ गजानन गुसिंगे याने २०१६ मध्ये पोलिस भरतीला अर्ज केला होता. मैदानी चाचणी त्याने दिली पण लेखी परीक्षेदिवशी भावाच्या जागी सुप्पडसिंग हा डमी उमेदवार म्हणून बसला होता.
या प्रकरणात फसवणूक, तोतयेगिरी, बनावट ओळखपत्रांचा वापर, कट-कारस्थान अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल आहे.
२४ एप्रिल २०१६ : परीक्षा केंद्रावर घडला गोलमाल
शिवाजीनगर पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर ही परीक्षा होत होती. त्यासाठी
– बनावट ओळखपत्र तयार करण्यात आले
– नोंदणीकृत उमेदवाराऐवजी भाऊ परीक्षेला बसला
– हा प्रकार त्या वेळी लक्षात आला पण आरोपी फरार होते
गजानन आणि त्याच्या जागी बसलेला व्यक्ती कोण आहे याचा तपास गुन्हे शाखा करत होती.
साक्षीदाराने उघड केला डमी चा चेहरा — आणि कहाणी पलटली
एका साक्षीदाराने चौकशीत सांगितले की, परीक्षेला बसलेली तोतया व्यक्ती म्हणजे गजाननचा सख्खा भाऊ सुप्पडसिंग होता.
तपास अधिकाऱ्यांनी पोलिस विभागाकडून नोंदी मागवल्यावर धक्कादायक माहिती समोर आली—
सुप्पडसिंग स्वतः २०२३ मध्ये पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेत दाखल झाला होता आणि सध्या पिंपरी–चिंचवड आयुक्तालयात कार्यरत होता.
गुन्हे शाखेची कारवाई
राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ७ मधून सुप्पडसिंगला ताब्यात घेतले. गजानन मात्र अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. तपास दरम्यान खालील गोष्टींची माहिती घेण्यात येणार आहे.
बनावट ओळखपत्र कुठे तयार केले?
दोघांमध्ये नेमका कट कसा रचला गेला?
त्या वेळचे पर्यवेक्षक, स्टाफ यांची भूमिका?
सरकारी वकील आणि तपास अधिकाऱ्यांनी पोलिस कोठडीची मागणी केली आणि न्यायालयाने ती मंजूर केली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम