पुनगाव येथे आदिवासी कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामशिवार फेरीचे आयोजन

बातमी शेअर करा...

पुनगाव येथे आदिवासी कल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी ग्रामशिवार फेरीचे आयोजन

चोपडा प्रतिनिधी आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनुसूचित जमातींसाठी सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने यावल विभागीय आदिवासी प्रकल्पांतर्गत पुनगाव (ता. चोपडा) येथे आज, ३० सप्टेंबर रोजी ग्रामशिवार फेरीचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात भगवान बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी यावल प्रकल्प अधिकारी अरुण पवार, भाजपा अनु. जमाती मोर्चा जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष मगन बाविस्कर, ग्रामसेवक भाईदास पाटील यांनी ग्रामस्थांना विविध योजनांची माहिती दिली.

विशेषतः महिला बचत गटांसाठी राज्य सरकारने नव्याने सुरू केलेल्या राणी दुर्गावती योजना बद्दल मगन बाविस्कर यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या प्रसंगी पुनगाव जिल्हा परिषदेच्या शाळेच्या मुख्याध्यापिका सुनिता बाविस्कर, उपसरपंच रेखाबाई बाविस्कर, विकास सोसायटीचे व्हाइस चेअरमन गोकुळ सोनवणे, सेवानिवृत्त रेल्वे टपाल अधिकारी जंगलु बाविस्कर, माजी ग्रामपंचायत सदस्य विष्णुदादा बाविस्कर, भाजपा अनु. जमाती मोर्चा जिल्हा सरचिटणीस दिपक बाविस्कर यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम