औरंगजेबाची घोषणा देणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ लावा : नीलम गोऱ्हे यांच्या सूचना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ मार्च २०२३ । राज्यातील औरंगाबाद शहराचे नुकतेच छत्रपती संभाजीनगर असे नामांतर झाल्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांचे बेमुदत साखळी उपोषण सुरू आहे. या आंदोलनात औरंगजेबाचे फलक झळकले आणि औरंगजेबाच्या नावाने घोषणाबाजी झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घोषणा देणाऱ्यांवर ‘एमपीडीए’ लावा अशा सूचना दिल्या आहेत.

छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर 4 मार्चपासून खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली नामांतरविरोधी संघर्ष समितीतर्फे औरंगाबादच्या नामांतराविरोधात आंदोलन सुरू आहे. संभाजीनगरमध्ये काही लोकांकडून नामंतराच्या मुद्द्यावरून औरंगजेबाचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यांच्यावर तातडीने कारवाई करण्याची मागणी आज विशेष बाब अंतर्गत मुद्दा उपस्थित करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. औरंगजेबाचे उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई होणार, अशी ग्वाही दानवे यांच्या मागणीवर सरकारकडून देण्यात आली. तसेच आंदोलनकर्त्यांकडून कोणतीही वेळ न पाळता रात्री १२ वाजेपर्यंत घोषणाबाजी करून वेळेच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे याकडे दानवे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.
सरकारकडून उत्तर देताना सांगण्यात आले की, या आक्षेपार्ह बाबीची शासनाकडून गंभीर दखल घेतली जाईल. आजच गृहमंत्री यांच्याशी चर्चा करून त्यावर कारवाई केली जाईल, असे आश्वासन सरकारकडून देण्यात आले. तसेच औरंगजेबाच समर्थीकरण व उदात्तीकरण करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक करून याबाबत तपासणी करण्यात यावी, असे निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले.

नेमके प्रकरण काय?
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केल्याच्याविरोधात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे. मात्र, उपोषणाच्या पहिल्याच दिवशी एका तरुणाने आंदोलनस्थळी औरंगजेबाचे फोटो, पोस्टर झळकावले. त्यानंतर आयोजकांनी या तरुणाला तिथून पिटाळले. यावेळी औरंगजेबाची घोषणाबाजी केल्याचा आरोपही झाला. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मीर आरेफ अली मीर फारुक अली यांच्या फिर्यादीनुसार पाच मार्च रोजी अज्ञात चौघांविरोधात कलम-१५३ (अ), ३४ नुसार सिटीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम