रेचलने टेनिस सोडले अन राहिली विश्वात नंबर 1 महिला !
दै. बातमीदार । २७ डिसेंबर २०२२ । अमेरिकेची प्रसिद्ध माजी टेनिसपटू रेचल स्टहलमॅन सोशल मीडियावर बरीच चर्चेत असते. रेचलने टेनिस खेळणं बंद केलय. रेचलने अचानक टेनिस खेळणं का सोडलं? त्यामागे काय कारण आहेत? त्याचा खुलासा तिने केलाय. रेचल स्टहलमॅन ज्यूनियर लेव्हलची एक चांगली टेनिसपटू होती. तिने USTAs Junior Circuit आणि NCAA Division सारख्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करुन दाखवलीय. पण अचानक तिने टेनिस खेळणं बंद केलं.
रेचलने त्यामागच कारण इंटरव्यूमध्ये सांगितलं. “टेनिसमध्ये मी चांगली उंची गाठू शकली असती, पण त्यासाठी मला 5 ते 7 वर्ष लागली असती. मला छोट्या शहरांमध्ये खेळायच नव्हत. म्हणून मी टेनिस सोडून रिपोर्टिंग आणि ब्लॉगिंग सुरु केलं” असं रेचलने सांगितलं.
रेचल टेनिस विश्वातील नंबर 1 महिला इनफ्लूसर आहे. रेचल स्टहलमॅन आपल्या फिटनेससाठी सुद्धा ओळखली जाते. ती बऱ्याचदा आपल्या वर्कआऊटचे व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते. सोशल मीडियावर तिला 2.62 लाखापेक्षा जास्त लोक फॉलो करतात. रेचल फक्त टेनिसमधूनच नाही, तर ग्लॅमरस फोटो आणि फॅशनमधूनही पैसा कमावते. सध्या टेनिसवर एक पुस्तक लिहित असल्याचं रेचलने सांगितलं. सेंट लुईसमध्ये एक प्रोफेशनल टेनिस टुर्नामेंट लॉन्च करणार असल्याचं तिने सांगितलं.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम