मोदी सरकारवर राहुल गांधीचा हल्लाबोल म्हणाले ते माझे गुरु…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३१ डिसेंबर २०२२ । मी आरएसएस व भाजपच्या लोकांचे आभार मानतो. ते माझ्यावर जेवढे हल्ले करतात, तेवढा मी उजळून निघतो. भाजप व संघाचे लोक माझे गुरू आहेत. पुन्हा एकदा केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार, भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत हल्ला केला.

राहुल गांधींची भारत जोडो यात्रा काही दिवस विश्रांतीसाठी थांबली आहे. ती 3 जानेवारीपासून पुन्हा सुरू होऊन उत्तर प्रदेश, पंजाब मार्गे जम्मू काश्मीरमध्ये प्रवेश करेल. भारत जोडो यात्रा आतापर्यंत यशस्वी ठरली आहे. आमचे अनेक मुद्दे आहेत. यात बेरोजगारी व महागाई महत्त्वपूर्ण आहे. भारतातील काहीजण अत्यंत कमी वेळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनलेत. पण देशातील बहुतांश जनता गरिबीच्या खाईत लोटली गेली आहे.
सुरक्षेवर बोलताना राहुल म्हणाले – मी बुलेटप्रुफ गाडीतून भारत जोडो यात्रा करावी अशी भाजपची इच्छा आहे. पण मला ते मान्य नाही. यामुळेच ते मी सुरक्षा प्रोटोकॉल तोडत असल्याची अफवा वारंवार पसरवत आहेत. मला थंडी वाजत नाही. त्यामुळे मी स्वेटर घालत नाही. खरे सांगायचे तर भारत जोडो यात्रेत आतापर्यंत मला कुठेही थंडी वाजली नाही.

थंडी वाजण्यास सुरूवात होताच मी स्वेटर घालणे सुरू करेल. भारत जोडो यात्रा सुरू होण्याच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधींनी 9 सप्टेंबर रोजी तामिळनाडूत पत्रकार परिषद घेतली होती. त्यात त्यांनी संघ व भाजपवर निशाणा साधला होता. ते म्हणाले की, भाजप व संघ देशात द्वेष पसरवण्याचे पातक करत आहेत. याविरोधात ही यात्रा आहे. यावेळी एका पत्रकाराने त्यांना या यात्रेचा काँग्रेसला फायदा होईल काय? असा सवाल केला असता त्यांनी ही यात्रा भाजपच्या द्वेषाविरोधात असून, त्याचा काँग्रेसला फायदा झाला तर चांगलीच गोष्ट आहे, असे स्पष्ट केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम