दै. बातमीदार । ३ एप्रिल २०२३ । कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांना बदनामीच्या खटल्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानं त्यांची खासदारकी रद्द झाली आहे. यापार्श्वभूमीवर त्यांनी कोर्टाच्या या निर्णयाविरोधात अपील करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी ते आजच सूरत जिल्हा कोर्टात दाखल होणार आहेत. यापार्श्वभूमीवर काँग्रेसनं जोरदार शक्तीप्रदर्शन केलं असून कोर्टाच्या बाहेर राहुल गांधींचे पोस्टर्स लागले आहेत. याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
सूरत कोर्टाच्या बाहेर लावण्यात आलेल्या पोस्टर्सवर राहुल गांधींसह काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचाही फोटो आहे. तसेच या पोर्स्टर्सवर फोटोंसह ‘डरो मत’, ‘सत्यमेव जयते’ असंही लिहिण्यात आलं आहे. युवक काँग्रेसच्यावतीनं ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे.
VIDEO | Posters of Rahul Gandhi outside Surat Sessions Court where the Congress leader is scheduled to file an appeal against his conviction in a criminal defamation case over his "Modi surname" remarks later today. pic.twitter.com/733BYyjdJZ
— Press Trust of India (@PTI_News) April 3, 2023
दरम्यान, राहुल गांधी सूरत कोर्टाकडं जाण्यासाठी रवाना झाले आहेत. दुपारी तीन वाजेपर्यंत ते कोर्टात दाखल होणार आहेत. सूरत कोर्टानं त्यांना बदनामीच्या फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरवलं आहे. ‘मोदी’ या आडनावावरुन टीका केल्यानं त्यांच्याविरोधात खटला दाखल करण्यात आला होता.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम