परदेशात राहुल गांधींची ट्रकवारी !
दै. बातमीदार । १४ जून २०२३ । देशातील कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी 30 मे पासून अमेरिका दौऱ्यावर आहेत. तेथील भारतीय वंशाच्या लोकांशी संपर्क साधताना त्यांनी नुकतीच एक ट्रक ट्रिप केली. त्याचा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. राहुल यांनी वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क असा 190 किलोमीटरचा प्रवास ट्रकमधून केला. तसेच भारतीय वंशाचे ट्रक चालक तजिंदर सिंग यांच्यासोबत राजकारणापासून महागाईपर्यंतच्या मुद्द्यांवर चर्चा केली.
सिद्धू मुसेवाला यांची गाणीही ऐकली. ट्रक चालकाने राहुल यांना विचारले की, तुम्ही सिद्धू मुसेवालांची गाणे ऐकाल का, ते काँग्रेसचे कार्यकर्ते होते, त्यांना न्याय मिळाला नाही. यावर राहुल म्हणाले- हो नक्कीच त्यांचे गाणे लावा. मला ते खूप आवडायचे. वॉशिंग्टन ते न्यूयॉर्क प्रवासादरम्यान राहुल ट्रकचालकाच्या शेजारील सीटवर बसले. राहुल म्हणाले – अमेरिकेचे ट्रक भारतापेक्षा अधिक आरामदायक आहेत. भारतातील ट्रक ड्रायव्हरच्या आरामाची पर्वा करत नाहीत. ते ट्रक चालकांसाठी बनवलेले नाहीत. तजिंदर राहुल यांना सांगतात की अमेरिकेत ट्रक चालवणे हे सन्मानाचे काम आहे.
ट्रकच्या प्रवासादरम्यान, राहुल ताजिंदरला त्यांच्या कमाईबद्दल विचारतात आणि त्यांचे उत्तर ऐकून धक्काच बसतो. ताजिंदर राहुल यांना सांगतात की भारतीय ड्रायव्हर्सच्या तुलनेत इथे ट्रकर्स खूप कमावतात. ताजिंदर म्हणाले- दरानुसार गाडी चालवली तर 5 ते 6 लाख होतात. दुसरीकडे, जर तुमच्याकडे स्वतःचा ट्रक असेल तर तुम्ही एका महिन्यात 8 लाख रुपयांपर्यंत कमाई करू शकता. हे उत्तर ऐकून राहुल यांना धक्काच बसला. यावर ताजिंदर सांगतात की, अमेरिकेत ट्रक चालवून खूप काही कमावता येते, तर भारतात ट्रकचालक आपल्या कुटुंबाचे पोट भरू शकत नाहीत.
राहुल यांनी ताजिंदर यांना विचारले की तुम्ही भारतातील ट्रक चालकांना काय संदेश द्याल. यावर ताजिंदर म्हणाले की तुम्ही लोक खूप मेहनत करत आहात. तुम्हाला शुभेच्छा. राहुल पुढे म्हणाले – भारतात ट्रक चालवणे ही दुसरी गोष्ट आहे, तिथे ट्रक ड्रायव्हरकडे ट्रक नसतो, ट्रक दुसऱ्याचा असतो.
यावर तजिंदर यांनी राहुल यांना सांगितले की, येथे कोणाकडेही पैसे नाहीत. डाउन पेमेंट भरून ट्रक घेतात, बँकेतून कर्ज घेतात. भारतातील कर्जासाठी मालमत्तेची कागदपत्रे आवश्यक आहेत. गरिबांकडे मालमत्तेची कागदपत्रे नाहीत. म्हणूनच ते कोणाचाही ट्रक चालवत राहतात.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम