सायबर फसवणूक प्रकरणी देशात ७६ ठिकाणी छापे

बातमी शेअर करा...

बातमीदार | २० ऑक्टोबर २०२३

देशात सायबर आर्थिक फसवणुकीचे पाच वेगवेगळे गुन्हे दाखल झाल्यानंतर ‘केंद्रीय अन्वेषण ब्यूरो’ अर्थात ‘सीबीआय’ने ऑपरेशन चक्र – २ राबवत देशभरातील ७६ ठिकाणी गुरुवारी छापे टाकले. यापैकी एक प्रकरण हे क्रिप्टोकरन्सी फसवणुकीद्वारे भारतीय नागरिकांचे १०० कोटी रुपये लुटणाऱ्या रॅकेटशी संबंधित आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आर्थिक गुप्तचर शाखेने (एफआययू) दिलेल्या माहितीच्या आधारे सीबीआयने पाच विविध प्रकारच्या फसवणुकीचे गुन्हे नुकतेच दाखल केले आहेत. ॲमेझॉन आणि मायक्रोसॉफ्टच्या तक्रारीवरून दोन गुन्हे दाखल आहेत. यात, आरोपी कॉल सेंटर चालवत होते आणि परदेशी नागरिकांना लक्ष्य करण्यासाठी कंपन्यांचे तांत्रिक समर्थन असल्याचे ते सांगत होते. सीबीआयने देशाच्या विविध भागांतील ९ कॉल सेंटरची झडती घेतली, असेही अधिकाऱ्यांनी ” सांगितले. दरम्यान, सीबीआयने एफआययू, एफबीआय, इंटरपोल आणि इतर आंतरराष्ट्रीय तपास संस्थांनी दिलेल्या माहितीच्या अधारे कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, हिमाचल प्रदेश, हरियाणा, केरळ, तामिळनाडू, पंजाब, दिल्ली आणि पश्चिम बंगालमध्ये धाडी टाकल्या.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम