पुढील आठवड्यात या भागात होऊ शकते पावसाचे आगमन !
दै. बातमीदार । २९ मे २०२३ । राज्यात सध्या तप्त उन्हाळा सुरु असून शेतकरी पावसाच्या पाण्याची वाट बघणार आहेत.केरळमध्ये पुढच्या आठवडाभरात मॉन्सून दाखल होणार आहे. तर राज्यातील काही भागांत या आठवड्यात पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज असून काही जिल्ह्यांमध्ये आज आणि उद्या मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान यावेळी मान्सून सामान्य राहण्याचा अंदाज असून जून ते सप्टेंबर या कालावधीत देशात 96 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे.
राज्यात पुढील दोन दिवस काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर पुढील 3 दिवस कमाल तापमान 2-4 अंश सेल्सिअसनं वाढण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. केरळात मान्सून 4 जूनपर्यंत दाखल होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. अशातच मुंबई देखील जूनच्या दुसऱ्या आठवड्यापासून मान्सून पूर्व पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मान्सून लवकरच राज्यात दाखल होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज महत्त्वाच्या बैठका बोलवल्या आहेत. राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, कोकण आपत्ती सौम्यकरण प्रकल्पाची बैठक, मान्सून पूर्व तयारी आढावा बैठक आज सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडणार आहे. या बैठकांमध्ये मुख्यमंत्री मान्सूपूर्व कामाचा आढावा घेणार आहेत. दरम्यान, मान्सूच्या पार्श्वभूमीवर या बैठकांचं आयोजन करण्यात आलं आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम