उद्धव ठाकरे शेतकऱ्याच्या बांधावर अन शेतकरीचा तक्रारीचा पाऊस !
बातमीदार | ८ सप्टेंबर २०२३ | माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अहमदनगर जिल्ह्यातील दुष्काळसदृश्य परिस्थिती असलेल्या गावांना भेटी दिल्या. यावेळी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेत सरकारपर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देत तसेच विद्यार्थ्यांकडून शिदोरी घेत दुष्काळ दौरा केला. “साहेब प्यायला पाणी नाही, पिके करपून चालली, शिर्डी विमानतळासाठी जमिन्या दिल्या, मात्र गावचा विकास नाही,” असा व्यथा अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह गावकऱ्यांनी मांडल्या.
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज दुष्काळी दौऱ्यानिमित्त अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील कातरी, संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे, कोपरगाव, संगमनेर आणि पुणतांबा या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला. इथल्या स्थानिकांनी शेतकऱ्यांनी उद्धव ठाकरेंना हेच सांगितलं की, “शासन आपल्या दारी कार्यक्रम आमच्याच गावात झाला, पण आमच्या गावाला कोणतीही मदत मिळाली नाही. आतापर्यंत पीक विमा कंपन्या असो किंवा सरकार असो सर्वांनी आमच्याकडे दुर्लक्ष केले.” उद्धव ठाकरे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिर्डी जवळच्या काही गावांमध्ये गेले. दरम्यान आज काही भागात रिमझिम पाऊस सुरु झाला आहे, तरी या पावसाचा कोणताही सकारात्मक परिणाम पिकांवर होऊ शकणार नाही. पीक नव्याने उभं राहणे अशक्य असल्याचं शेतकऱ्यानी सांगितले.
उद्धव ठाकरे हे आज अहमदनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले. या ठिकाणी अनेक भागातील शेतकऱ्यांशी संवाद साधत अडचणी समजून घेतल्या. याचबरोबर संगमेनर तालुक्यातील तळेगाव येथे दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी करुन शेतकऱ्यांशी संवाद साधला, त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. तसेच संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द गावातील शेतीची पाहणी केली. दुष्काळामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली असताना, घटनाबाह्य सरकार जिल्ह्यात सभा घेतंय, पण शेतकऱ्यांच्या बांधावर यायला त्यांना वेळ नाही, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर घटनाबाह्य सरकारकडे तोडगा नाही. पण शिवसेना नेहमी बळीराजासोबत आहे, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला. त्यामुळे लवकरात लवकर शासन दरबारी न्याय मिळावा, दुष्काळ जाहीर होऊन मदत मिळावी, अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम