बिपरजॉय वादळापुर्वी मुंबईच्या किनाऱ्यावर पाऊस ; ९ जणांचा मृत्यू
दै. बातमीदार । १४ जून २०२३ । बिपरजॉय हे गेल्या २५ वर्षांतील जून महिन्यात गुजरातच्या किनारपट्टीवर धडकणारे पहिले वादळ असेल. यापूर्वी 9 जून 1998 रोजी गुजरातच्या किनारपट्टीवर वादळ आले होते. त्यानंतर पोरबंदरजवळ 166 किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. गेल्या 58 वर्षांचा विचार केला तर 1965 ते 2022 दरम्यान अरबी समुद्रात 13 चक्रीवादळे निर्माण झाली. यापैकी दोन गुजरातच्या किनारपट्टीवर धडकले. एक महाराष्ट्र, एक पाकिस्तान, तीन ओमान-येमेन आणि सहा समुद्रावर कमकुवत झाले.
अरबी समुद्रात गुजरातला धडकण्यासाठी बिपरजॉय वादळाचा अवघा एक दिवस बाकी आहे. 15 जूनच्या संध्याकाळपर्यंत ते कच्छ जिल्ह्यातील जाखाऊ बंदरावर धडकेल. यादरम्यान 150 किमी/तास वेगाने वारे वाहण्याची अपेक्षा आहे. गुजरात आणि मुंबईच्या किनारी भागात जोरदार वारे आणि उंच लाटांमुळे आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे, गुजरात सरकारने कच्छ-सौराष्ट्रातील किनाऱ्यापासून 10 किमीच्या आत असलेल्या 7 जिल्ह्यांतील 30,000 लोकांना बाहेर काढले आहे आणि त्यांना निवारागृहात पाठवले आहे.
बुधवारी सकाळी साडेआठ वाजता हवामान खात्याच्या अपडेटनुसार हे वादळ ताशी 8 किमी वेगाने उत्तर-पश्चिम दिशेने सरकत आहे. बुधवारी सकाळी हे वादळ द्वारकापासून 290 किमी आणि जाखाऊ बंदरापासून 280 किमी अंतरावर होते. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, चक्रीवादळ 14 जूनच्या सकाळपर्यंत उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे, त्यानंतर ते पुन्हा परत येईल आणि उत्तर-ईशान्य दिशेने सरकेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम