उत्तर प्रदेशात पावसाने कहर केला; इटावा प्रयागराजसह अनेक जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती गंभीर

advt office
बातमी शेअर करा...

दै. बातमीदार ३१ ऑगस्ट २०२२ । उत्तर प्रदेशातील इटावामध्ये पुरामुळे परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. यमुना आणि चंबळ नद्यांचे पाणी वाढल्याने परिसरातील अनेक गावे पुराच्या विळख्यात आहेत. पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागातील नागरिकांना पाणी साचण्याची समस्या भेडसावत आहे.

 

आता हळूहळू पाण्याची पातळी कमी होत असल्याने गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असला तरी परिस्थिती अजूनही दयनीय आहे. प्रशासनाचे पथक सतत मदत आणि बचाव कार्यात लोकांना मदत करत आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पूरग्रस्तांना सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश जारी केले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम