राज ठाकरेंनी केली उद्धवांची पाठराखण ; जाणून घ्या सविस्तर !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ११ एप्रिल २०२३ ।  राज्यात भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी प्रकरणी केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंनी पाठराखण केली. चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यावर ट्विट करून राज ठाकरेंनी उत्तर दिले आहे. बाळासाहेबांच्या प्रामाणिकपणावर, त्यांचे शौर्य, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी राज ठाकरेंनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐका असा सल्लाही मनसेतर्फे दिला गेला.

काय आहे मनसेचे ट्विट !
अयोध्या रामजन्मभूमी आंदोलनात, बाबरीचा विध्वंस झाल्यानंतर उसळलेल्या धार्मिक उन्मादात जनतेसाठी अभेद्य ढाल बनलेल्या बाळासाहेब ठाकरेंच्या प्रामाणिकपणावर, त्यांच्या शौर्यावर, धैर्यावर प्रश्नचिन्ह उभे करणाऱ्यांनी राज ठाकरेंनी सांगितलेला हा प्रसंग जरूर ऐकावा !
बाळासाहेबांचा बाबरी विध्वंसाचा संबंध नसल्याबाबतची जी वक्तव्ये सध्या सुरू आहेत. त्यावर मनसेने एक व्हिडिओ ट्विट केला आहे. त्यात राज ठाकरे यांची काही मिनिटांची क्लिप दाखवली असून राज ठाकरेंनी त्यात तेव्हाचे अनुभव कथन केले.

त्या व्हिडिओत काय म्हणतात राज ठाकरे?
मनसेने ट्विट केलेल्या व्हिडिओत राज ठाकरे म्हणतात की, मला तोही प्रसंग आठवतो ज्यावेळी मी खोलीत खाली बसलो होतो. त्यावेळी बाबरी मशिद पडली होती. दुपारची वेळ होती. दिड दोन तासांनी बाळासाहेब ठाकरेंना फोन आला. त्यांनी बाळासाहेबांना प्रश्न विचारला की, येथे कुणी जबाबदारी घ्यायला तयार नाही. पण भाजपचे सुंदलाल भंडारी म्हणत आहेत की, ही गोष्ट भाजप किंवा भाजपच्या लोकांनी केली नाही. कदाचित ती शिवसैनिकांनी केली असेल. त्यावेळी बाळासाहेब म्हणाले की, ही गोष्ट जर शिवसैनिकांनी केली असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. त्यावेळी, त्या क्षणाला एक जबाबदारी अंगावर घेणे ही किती महत्वाची गोष्ट होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम