सत्तेच्या निकालावर राज यांची प्रतिक्रिया : अटक केली की सोडलं ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ मे २०२३ ।  राज्यात सुरु असलेल्या ठाकरे व शिंदे यांच्यातील संघर्षवर सुनावणी झालेली आहे. यावर अनेक नेते भाष्य करीत आहे. तर दुसरीकडे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत वक्तव्य केले आहे.

राज ठाकरे आज मीरा रोडच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी चर्चा करताना राज यांनी सुप्रीम कोर्टाच्या निकालावर प्रतिक्रिया नोंदवली. कोर्टाच्या निकालाची भाषा फार किचकट असते असं राज यांनी सुरुवातीला म्हटलं. “कोर्टाची भाषा वाचल्यावर समजत नाही की आपल्याला अटक केली आहे की सोडलं आहे. इतकी कॉम्पिलिकेटेड भाषा असते ती,” असं राज म्हणाले. तसेच पुढे बोलताना राज यांनी, “कालच्या (सुप्रीम कोर्टाच्या) निकालात त्यांनी हे सांगितलं की सगळी प्रोसेस चुकली पण मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यायला नको होता. मी जे वाचलं त्याप्रमाणे विधीमंडळातील गटाला पक्ष म्हणून समजलं जाणार नाही तर बाहेरचाच पक्ष समजला जाणार. आता ही घोषणा झाल्यानंतर निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला आहे त्याचं काय होणार?” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम