राजयोग अभ्यासकेंद्रामुळे परिसरात वैश्विक शांतीचे वातवरण – राजयोगीनी ब्रह्माकुमारी संतोषदीदी
ब्रह्माकुमारीज् अमळनेरच्या नवीन सेवास्थानाचे भूमिपुजन
गौरवकुमार पाटील / पाडळसरे
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाद्वारे जागतिक पातळीवर वैश्वीक सदभावनेचे प्रयत्न होत असतांना स्थानिक अमळनेर सेवाकेंद्रामार्फत होत असलेल्या नियोजित शांती सरोवर राजयोग केंद्राद्वारे वैश्विक शांती प्रसारित होईल असा आशावाद राजयोगीनी ब्रह्माकुमारी संतोषदीदीजी, माऊंट आबू यांनी ब्रह्माकुमारीज् अमळनेरच्या नवीन सेवास्थानाचे भूमिपुजन प्रंसगी व्यक्त केला.
ब्रह्माकुमारीज् तर्फे गलवाडे रोड स्थित नवीन राजयोग सेवास्थानाचे भूमिपुजन आयोजित करण्यात आले. त्याप्रसंगी त्या बोलत होत्या. समाज परिवर्तन करीत असतांना अवगूणमुक्त, व्यसनमुक्त आणि विकार मुक्त समाज व्हावा यासाठी परिसरात अमळनेर सेवाकेंद्रामार्फत होत असलेल्या विशेष प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. परिसरात असलेल्या शांतीपूर्ण आणि नैसर्गीक व आध्यात्मिक पाश्र्वभूमी लाभलेल्या वातवरणात राजयोग अभ्यास अधिक प्रभावी आणि परिणामकारकरित्या साधकांना करता येईल असेही त्या म्हणाल्यात.
प्रास्ताविक करतांना ब्रह्माकुमारी विद्या बहन यांनी स्पष्ट केले की, अमळनेर परिसरात या नवीन सेवास्थानाने मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी अधिक कार्यक्रम, उपक्रम राबविण्यास मदत मिळणार आहे. ब्र.कु. मिनाक्षीदीदी यांनी उपक्रमास आशीर्वाद दिलेत.
तत्पूर्वी शांती सरोवर राजयोग अभ्यासकेंद्राचे भूमिपुजन ब्रह्माकुमारी संतोषदीदीजी, सह मुख्य प्रशासिका, ब्रह्माकुमारीज् माऊंट आबू, ब्र.कु. मिनाक्षीदीदी, उपक्षेत्रीय निर्देशिका, जळगाव, बी.के. मिरादीदी, बी.के. विद्यादीदी, संचालिका, अमळनेर सेवाकेंद्र, डॉ. बी.एस. पाटील, माजी आमदार, अमळनेर, श्रीमती स्मीता वाघ, माजी आमदार, अमळनेर, डॉ. अनिल शिंदे, कार्याध्यक्ष खा.शि. मंडळाचे बजरंग अग्रवाल, उद्योजक, बी.के. सुरेश भाई, बी.के. मधुकरभाईजी, बी के निंबाभाई ,वरीष्ठ राजयोगी, डॉ. सोमनाथ वडनेरे, जळगाव, महाराष्ट्र मीडिया प्रमुख, मीडिया विंग ब्रह्माकुमारीज् माऊंट आबू, धीरजभाई सोनी, उद्योजक, जळगाव यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी उपरोक्त मान्यवरांची समायोचित मनोगतेही व्यक्त करण्यात आलीत. प्रा. वसुंधरा लांडगे यांच्या सेवानिवृत्ती निमित्त सत्कार करण्यात आला. कु. साक्षी हीने स्वागतनृत्य केले. बी.के. रुपाली बहन, अजमेर यांनी मंचसंचलन तर बी.के. हरीश्चंद्र भाई यांनी आभार व्यक्त केलेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम