राम मंदिराबाबत मोठी अपडेट : चार फोटो आले समोर !
दै. बातमीदार । २१ जुलै २०२३ । देशातील असंख्य रामभक्तांचे श्रद्धास्थान असलेले अयोध्यातील राम मंदिराबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. चार नवीन फोटो समोर आले आहेत. मंदिराचं काम वेगाने होत असल्याचं या फोटोंमधून दिसून येतंय. मंदिराच्या पहिल्या काम पूर्ण होत आलं आहे. २०२० साली पंतप्रधान मोदींच्या हस्ते या मंदिराच्या जागेचं भूमिपूजन करण्यात आलं होतं. आता हे मंदिर आकार घेतंय.
राम मंदिर ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी दिलेल्या माहितीनुसार, २०२४ च्या १५ ते २४ जानेवारीदरम्यान मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्रतिष्ठापणा होईल. मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर ही प्रतिष्ठापणा करण्याचं उद्दिष्ट आहे. पाच वर्षांच्या बालकाच्या रुपातील श्रीरामांची मूर्ती मंदिरात स्थापन करण्यात येणार आहे.
यावर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापर्यंत मंदिराच्या पहिल्या मजल्याचं काम पूर्ण होईल. त्यानंतर डिसेंबर अखेरपर्यंत फिनिशिंग टच देण्यात येईल. ग्राऊंड फ्लोअरवर भगवान श्रीरामांचं संपूर्ण कुटुंब असणार आहे. तर, दुसऱ्या मजल्यावर कोणतीही मूर्ती नसणार आहे, असं चंपत राय यांनी स्पष्ट केलं. मंदिराचे गर्भगृह अशा प्रकारे बांधण्यात आलं आहे, की पहिल्या चैत्र राम नवमीला सूर्याची किरणं थेट प्रभू श्रीरामांच्या मूर्तीवर पडतील. तसेच, एका वेळी ४०० लोक श्रीरामांचं दर्शन घेऊ शकतील. राम मंदिराच्या समोर पाच मंडपांच्या १६० खांबांवर मूर्ती कोरण्याचं काम सुरू आहे. हे खांब पिंक सँडस्टोनचे आहेत. तर, गर्भगृहामध्ये सहा पांढऱ्या संगमरवराचे खांब उभारण्यात येणार आहेत. प्रत्येक खांबावर तीन भाग असणार आहेत. याच्या वरच्या भागात ८ ते १२ मूर्ती, मधल्या भागात ४ ते ८ मूर्ती आणि खालच्या भागात ४ ते ६ मूर्ती असणार आहेत.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम