राणा दांपत्य आज न्यायालयात होणार हजर : हनुमान चालीसा पठण प्रकरण

बातमी शेअर करा...

बातमीदार | २८ ऑगस्ट २०२३ | राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याप्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी सलग दोन वेळा राणा दाम्पत्य कोर्टात गैरहजर राहिले होते. मात्र, आता न्यायालयाने फटकारल्यानंतर हे दोघेही आज मुंबई सत्र न्यायालयात हजर राहणार आहेत.

मातोश्री निवासस्थानाबाहेर अनुमान चालीसा प्रकरणावरुन राज्यात मोठ्या प्रमाणात गदारोळ झाला होता. या प्रकरणात खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या करणी मागील सुनावणीत खासदार नवनीत आणि त्यांचे आमदार रवी राणा गैरहजर होते. याचीच न्यायालयाने गंभीर दखल घेतली होती. न्यायाधीश राहुल रोकडे यांनी या प्रकरणी दोघांना सुनावले होते. त्या वेळी संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने खासदार नवनीत राणा यांची गैरहजेरी न्यायालयाने मान्य केली मात्र, रवी राणा यांच्या गैरहजेरीवर ताशेरे आढले होते. गेल्या सुनावणीच्या वेळी तर राणा यांचे वकील रिझवान मर्चंटही न्यायालयात गैरहजर होते. सरकारी वकील सुमेर पंजवानीही गैरहजर होते. तसेच तपासाधिकारी सिक लिव्हवर (आजारपणाची सुट्टी) असल्याची माहिती समोर आली. यावर तीव्र नाराजी व्यक्त करत आज संबंधित सर्वांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टाने फटकारल्यानंतर राणा दाम्पत्यानी सावध भूमिका घेत न्यायालयत हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम