अमरावतीत राणा दाम्पत्य विरुद्ध भाजप आमने – सामने !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ एप्रिल २०२३ ।  उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हनुमान चालिसावरून आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा आक्रमक झाल्या. त्यांनी मातोश्रीसमोर जाऊन हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिला. या नंतर दोघांनाही अटक झाली. त्यावेळेस राणा दाम्पत्याच्या बाजून राज्यातले भाजप नेतृत्व उभे झाले. मात्र, स्थानिक भाजप नेत्यांनी राणा दाम्पत्याचे जमत नाही. इथला बेबनाव पुन्हा समोर आला आहे.

अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना पाहायला मिळतो आहे. विकास कामांच्या श्रेयावरून ही लढाई जुंपली आहे. याची खुसखुशीत चर्चा सुरू आहे. भाजपच्या प्रत्येक मोहिमेत खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा पुढे असतात. ते अधिकृतरित्या भाजपमध्ये नसूनही पक्षाच्या जवळचे मानले जातात. मात्र, त्यांचे स्थानिक कार्यकर्त्यांशी सूत बिनसल्याचे समजते.

भाजपच्या प्रत्येक आंदोलनात राणा दाम्पत्य असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना तर त्यांनी घेतलेला आक्रमक पवित्रा उभ्या महाराष्ट्राने पाहिला. त्यांचे बोलविते धनी कोण, यावरूनही चर्चा रंगली. मात्र, या दाम्पत्याचे स्थानिक भाजप नेत्यांशी सूत जुळत नसल्याचे समजते. आता तर अमरावतीमध्ये राणा दाम्पत्य विरुद्ध भाजप असे चित्र विकासकामाच्या श्रेयवादावरून निर्माण झाले आहे. खासदार नवनीत राणा अपक्ष म्हणून निवडून आल्यात. आमदार रवी राणाही अपक्ष. त्यांनी अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे प्रस्तावित केली. मात्र, यातले एकहे काम सुरू झाले नाही. त्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झालेत. त्यांनी रवी राणाविरोधात आंदोलन केले. या कामांच्या ठिकाणी रवी राणा यांचे फलक लावले होते. त्या फलकाला काळे फासले. यावेळी भाजप आमदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यामुळे आगामी काळात हे वितुष्ट वाढणार असल्याचे दिसते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम