राणे आक्रमक ; वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का?
दै. बातमीदार । ५ एप्रिल २०२३ । राज्यातील माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन दिवसापासून उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत असतांना आता भाजपच्या नेते असलेले नारायण राणे यांनी या वादात उडी घेत उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
भाजपचे नेते नारायण राणे यांनी मुंबईत असतांना प्रसारमाध्यमांशी बोलले कि, मातोश्री नावाचे दोन्ही बंगले अधिकृत आहेत का, वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? उद्धव ठाकरे खोटारडा माणूस आहे. यापुढे भाजप नेतृत्वावरील टीका सहन करणार नाही, असा इशारा राणे यांनी दिला. ते मुंबईत त होते.
नारायण राणे म्हणाले की, राज्याचे माजी निष्क्रिय मुख्यमंत्री हे काल ठाण्यात कुणाची तरी डिलिव्हरी करायला गेले होते. माझ्याकडे डॉक्टरचे सर्व कागदपत्रे असून डॉक्टरांनी त्यांना काही झाले नसल्याचे सांगितले. उद्धव ठाकरेंना चांगले बोलता येते का, असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला आहे. त्यांनी राज्याच्या संस्कृतीला न शोभणारी भाषा त्यांनी काल केली. तर मुख्यमंत्री असताना त्यांच्या काळात सुशांत, दीक्षा सालियान, यांना प्रकरणाचे काय झाले. वाझे उद्धव ठाकरेंचे जावई आहेत का? असा सवाल ही नारायण राणे यांनी उपस्थित केला.
नारायण राणे म्हणाले की, देशाबाहेरील शक्तीसोबत संबंध असलेल्या लोकांना मंत्री केले , त्यांचे मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा काही केले नाही. पंतप्रधान, केंद्रीय मंत्री आणि राज्याचे गृहमंत्री यांच्यावर बोलण्याची त्यांची पात्रता नाही. बाळासाहेब असते तर हे कधीच उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते. हिंदुत्वाचा त्याग करुन पद मिळवले. उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या नावाशिवाय कुणी विचारत नाही. नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाकडे बघून कुणी शिवसेनेत प्रवेश केला का? मुख्यमंत्री असताना त्यांचे नेतृत्व कुणी स्वीकारले का?असा सवाल नारायण राणे यांनी उपस्थित केला. तर कोरोनाच्या काळात माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या माध्यमातून औषधींच्या प्रत्येक टेंडरमधून 15 टक्के पैसे घेण्यात आले.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम