
राणे पुत्राने संजय राऊतांना पाडले उघडे ; ट्विट करत गौप्यस्फोट !
दै. बातमीदार । ८ जानेवारी २०२३ राज्यातील राजकारणा आता चांगलेच तापले जरी असले तरी ते चुकीच्या वळणावर जात आहे. एकमेकाचे विरोधक असलेले राणे परिवार व ठाकरे गटातील संजय राऊत आता एकमेकाचे बाप काढू लागले आहे. यातच आता संजय राऊत यांनी आपण नारायण राणे यांनी पक्ष सोडल्यानंतर कधीच भेटलो नाही, असा दावा शनिवारी केला होता. त्यावर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी ट्विट करत गौप्यस्फोट केलाय.
नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यांत सुरु असलेल्या वादानंतर राणे यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्याचे वक्तव्य केले. राणे म्हणाले होते की, “एक ना एक दिवस मी उद्धव ठाकरेंना भेटणार आहे. मी खासदार झालो तेव्हा संसदेत असताना राज्यसभेत संजय राऊत माझ्या बाजूला येऊन बसायचा. उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरेंबद्दल जे काही सांगायचा ते मी उद्धव ठाकरेंना भेटून सांगणार आहे. ते सांगितल्यानंतर रश्मी आणि उद्धव ठाकरेंनी त्यांना चपलेने नाही मारलं तर बघा…”,
नारायण राणेंनी पक्ष सोडल्यापासून मी एकदाही त्यांना भेटलो नाही – संज्या राऊत
मग या फोटोमध्ये जो संज्या बसलाय तो तुझ्या बापाने दिल्लीमध्ये वेगळा जन्माला घातला होता काय. pic.twitter.com/NwCPOrlNwU
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) January 8, 2023
नारायण राणे यांच्या या आरोपांना नाशिकमधून संजय राऊत यांनी उत्तर दिले. यावर बोलतांना संजय राऊत म्हणाले की, राणे यांनी आदित्य ठाकरेंवर किती घाणरडे आरोप केलेयं, काहीही पुरावे नसताना आदित्य ठाकरे यांना बदनाम केलंय. रश्मी ठाकरेंसंदर्भात ते कोणत्या भाषेत बोलत होते. उद्धव ठाकरे यांच्याविषयी काय बोलले होते. राणे यांच्या वक्तव्यावर आताच माझे उद्धव ठाकरे यांच्यांशी बोलणे झालं. त्यावेळी उद्धव ठाकरे हसत होते. खरंतर राणेंनी पक्ष सोडल्यानंतर मी कधी त्यांना भेटलो नाही. मी कधी बेमान, गद्दांना भेटत नाही. त्यांचं तोंडही पाहत नाही. परंतु राणे यांना आता उद्धव ठाकरे यांना भेटण्याची इच्छा झाली असेल.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम