राणे पुत्राने घेतली राज ठाकरेंची भेट अन म्हणाले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १ डिसेंबर २०२२ ।  राज्यातील राजकारण चांगलेच तापत जरी असले तरी नेते मंडळीच्या भेटीगाठी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे कोकण दौऱ्यावर आहेत. आज ते सिंधुदुर्गात आहेत. या कोकण दौऱ्यादरम्यान नितेश राणेंनी यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली.

राज ठाकरे सावंतवाडीमध्ये दाखल झाले त्यावेळी नितेश राणे देखील सावंतवाडीमध्येच होते. त्यामुळे दोघांची भेट होऊ शकते, असं म्हटलं जात होतं. अखेर ही भेट झाली. या भेटीमध्ये दोघांमध्ये जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. परंतु भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली याचा तपशील अद्याप समजू शकलेला नाही. भेटीनंतर नितेश राणे बाहेर आल्यानंतर माध्यमांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली. त्यावेळी “ही कौटुंबिक भेट होती. यावर मला आणखी काही बोलायचं नाही,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली. तर राज ठाकरे आणि नारायण राणे यांची कौटुंबिक जवळीक यापूर्वीही अनेकदा दिसून आली आहे. परंतु जेव्हा दोन राजकीय नेते भेटतात तेव्हा राजकीय चर्चा होणार नाही, हे अशक्य आहे. त्यामुळे या भेटीचा उद्देश आगामी काळात समजू शकतो.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम