
राऊत हतबल झाले ; शिंदे गटाच्या आमदाराचे टीकास्त्र
दै. बातमीदार । २९ डिसेंबर २०२२ । हिवाळी अधिवेश सुरु असतांना सत्ताधारी व विरोधात चांगलेच एकमेकावर आरोप प्रत्यारोप करीत असल्याचे चित्र राज्य अनुभवत आहे तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रेशीमबागेतील भेटीवर खासदार संजय राऊत यांनी हल्लाबोल केला. त्यावर शिंदे गटाच्या आमदारांनी संजय राऊत यांच्यासह ठाकरे गटाच्या आमदारांवर हल्लाबोल सुरू केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील आमदारांनी संजय राऊत यांच्यावर जहरी टीका सुरू केली आहे. आमदार भरत गोगावले यांनी संजय राऊत यांच्यावर हल्लाबोल करत इशारा दिला आहे. संजय राऊत यांच्याकडे मसाला काही नाहीये, त्यांना काय बोलायचे ते बोलू द्या, सध्या ते हतबल आहेत. त्यामुळे त्यांना बोलू द्या. आम्ही कामानं उत्तर देऊ, रक्तांतर राष्ट्रवादीसोबत झालंय अशी टीका केली आहे. शरद पवारांना संजय राऊत टीम आतल्या बातम्या देतात असाही टोला लगावला आहे. संघाचा ड्रेसकोड आता बदलला आहे संघाची आता हाफपॅन्ट राहिली नाहीय फूल पॅन्ट झालीय असा पलटवार देखील गोगावले यांनी केला आहे. यावेळी दादरचं सेनाभवन घेण्याचं आमच्या डोक्यात नाही आम्ही घेणार नाही असाही खुलासा भरत गोगावले यांनी केली आहे.
आम्ही एका बापाचे होतो, म्हणून आम्ही हिम्मत केली तुम्ही आमचा बाप काढू नका असाही टोला गोगावले यांनी लावत जहरी टीका केली आहे.
भुंकणारा कुत्रा कधी चावत नाही, त्यांना किती गांभीर्यानं घ्यायचं हे पण आहे, आम्ही त्यांना गांभीर्याने घेत नाही असेही गोगावले यांनी सांगत ठाकरे गटाला सुनावलं आहे. केसरकर साहेबांनी फ्रिज चा खोक्याचा उल्लेख केलेला आहे. विरोधकाकडे खोके बोके आणि ओके अशी टीकाही करत फ्रिजच्या चाव्या सध्या आमच्याकडे आहेत, केसरकरांना सांगणार आहे लवकर फ्रिज उघडा म्हणून असा इशारा देखील गोगवले यांनी दिला आहे. एकूणच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संघाच्या कार्यालयातील भेटीवरुण आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे दिसून येत आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम