राऊत नाशिकला हिशोब घ्यायला येतात ; शिंदे गटाचा गंभीर आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जानेवारी २०२३ भाजपसह शिंदे गटावर वेळोवेळी टीका करणारे ठाकरे गटाचे संजय राऊत यांच्यावर आता नाशिक येथील शिंदे गटाच्या नेत्यानी पत्रकार परिषद घेत चांगलीच टीका केली आहे.

तुम्ही शिवसैनिकांना ओळखत नाहीत, तुम्ही शनिवार, रविवार फक्त हिशोब घ्यायला येतात. आत्तापर्यंत तुम्ही तेच केले यायचं हिशोब घ्यायचा आणि पैसे घेऊन परत जायचं असा गंभीर आरोप शिंदे गटाने केला आहे. शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांचा नुकताच नाशिक दौरा झाला. त्यात त्यांनी पुन्हा एकदा शहरात येऊन शिंदे गटाला व नव्यानेच शिंदे गटात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांवर सडकून टीका केली. संजय राऊत नाशिकला येण्यापूर्वी ठाकरे गटातून शिंदे गटात मोठ्या प्रमाणावर इन्कमिंग झाली होती. त्यामुळे संजय राऊत त्यांनी नाशकात येताच शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर हल्लाबोल करत जहरी टीका केली होती. ‘येडे गबाळे पकडतात, पदाधिकारी म्हणून प्रवेश करतात’, नाशिकमध्ये शिवसेना जशी तशी आहे, दोन-चार ठेकेदार तिकडे गेले असतील, मात्र शिवसेनेचे पदाधिकारी, प्रमुख आणि जमिनीवरची शिवसेना आणि शिवसैनिक जागेवरच आहेत, अशा शब्दात शिंदे गटात प्रवेश करणाऱ्यांना सुनावले होते.

दरम्यान यानंतर आता शिंदे गटाने पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांना प्रत्युत्तर देत चांगला समाचार घेतला आहे. यावेळी नुकत्याच शिंदे गटात प्रवेश केलेल्या रुपेश पालकर याने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयावर दावा करत ‘शिवसेना खासदार संजय राऊत म्हणतात जे गेले त्यांना ओळखत नाही, मात्र माझ्या वडिलांच्या नावावर शिवसेना कार्यालय आहे, या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयवर दावा करणार असे ते म्हणाले. त्यामुळे नाशिकमध्ये ठाकरे-शिंदे गटात आता मोठे रणकंदन होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदे गट नाशिक शहर पदाधिकारी तसेच खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषद घेत संजय राऊत यांच्या टीकेला प्रत्युत्तर देत त्यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम