राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदेंना दिले चँलेज ‘तो प्रश्न’ सोडून दाखवा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २२ नोव्हेबर २०२२ महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकारने समिती गठीत केलीय. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ही सर्वपक्षीय समिती गठीत केलीय. तसेच, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस या प्रश्नासंदर्भात पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री यांची लवकरच भेट घेणार आहेत. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना चँलेज दिले आहे.

बेळगावला महाराष्ट्रात सहभागी करुन घेण्यासाठी अनेकदा प्रयत्न करण्यात आले. पण सर्व प्रयत्न आतापर्यंत निष्फळ ठरले आहेत. पण तरीही राज्य सरकार त्याच जोमाने बेळगाव महाराष्ट्रात सामील करुन घेण्यासाठी लढणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अॅक्शन मोडवर आले आहेत.

यावर बोलताना, संजय राऊत यांनी सीमाप्रश्नासंदर्भात पंतप्रधान यांच्याशी काय चर्चा करणार हे जनतेसमोर उघड करा. अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी जनतेसमोर चर्चेला व्हिडीओ समोर आणावा. अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न मुख्यमंत्र्यांनी गंभीरतेने घ्यावा. सध्याच्या सरकारमधील किती मंत्री बेळगावला गेले. अशी विचारणा यावेळी राऊत यांनी केली तसेच, शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना सरकार वाचवत आहे. तर मग ते सीमावासीयांना काय न्याय देणार? असा सवालही त्यांनी उपस्थीत केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम