मुख्यमंत्र्यांनी दाढीवर हात फिरवला नसता तर राऊत खासदार झाले नसते ; मंत्री पाटील

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जानेवारी २०२३ राज्यात शिंदे गट व ठाकरे गटात नियमित वाद सुरु आहे. यावर आज खान्देशची मुलुखमैदान तोफ म्हणून ख्याती असलेले शिंदे गटातील नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी थेट ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर टीका केली  आहे.

पालकमंत्री गुलाबराव पाटील म्हणाले कि, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुसता दाढीवर हात फिरवला असता तर संजय राऊत खासदार झाले नसते. ते आडवे पडले असते,’ असे ते म्हणालेत. गुलाबराव जळगाव येथील हिंदू जनआक्रोश मोर्चामध्ये बोलत होते.

मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, संजय राऊतांना 41 मते पडली ती एकनाथ शिंदे यांच्यामुळे पडली आहे म्हणून तर ते निवडून आले आहे. एकनाथ शिंदे यांनी दाढीवर नुसता हात ठेवला असता तर आज संजय राऊत खासदार झाले नसते. आडवे झाले असते, संजय राऊत यांच्यावर यापूर्वी याच मुद्द्यावरून गुलाबराव पाटील यांनी हल्लाबोल केला होता. यावेळी गुलाबराव पाटील यांनी मात्र स्पष्टच सूनावले आहे. लव्ह जिहाद संदर्भात स्वतंत्र कायदा करावा यासह विविध मागण्यांसाठी आज जळगावत हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांसह विरोधकांवर निशाणा साधला. गुलाबराव पाटील म्हणाले की, अनेकजण आमच्यावर टीका करत आहेत, मात्र आम्ही शिवसेना वाचवण्यासाठी बाहेर पडलो असल्याचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले. बाळासाहेबांच्या विचारांवर चालणारी शिवसेना आहे.

गुलाबराव पाटील म्हणाले की, मला खुर्चीपेक्षा माझा धर्म महत्त्वाचा आहे, आधी आम्ही हिंदू आहोत मग मंत्री असे म्हणतानाच खुर्ची आम्हालरा देणारी जनता कधीही खुर्ची काढून घेऊ शकते, त्यामुळे आम्हाला केवळ धर्म महत्वाचा आहे. आमचा धर्म जरी महत्त्वाचा असला तरी आम्ही कुणाच्या धर्माला दुखवत नाही, पण आमच्या धर्माबाबत कोणी वाकडी नजर करत असेल तर मात्र आम्ही त्साला सोडणार नाही, असे म्हणतानाच इस देश में रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा, हे ओवैसीच्या…. सांगितले होते असे आक्षेपार्ह वक्तव्य करत एकेरी टीका केली आहे. ​​​​ मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले की, पावरा समाजाच्या धर्मांतराचे काम खिश्च्रनांकडून सुरु आहे. आमच्या धर्माकडे कुणी वाकड्या नजरेने बघत असेल तर कुणी सहन करणार नाही. आज मी मंत्री आहे की आमदार आहे, त्यापेक्षा तुमच्यातला हिंदु आहे. खुर्ची देणारे आणि ओढणारेही तुम्ही आहात. खुर्चीपेक्षा धर्म महत्वाचा आहे. इतिहास बघितला तर जैन हे हिंदू आहेत. हिंदू जनजागृती समितीचे पूर्ण भारतभर हे आंदोलन सुरु आहे. जिल्हा प्रशासनाला परवानगी देण्यास सांगितल्याचेही ते म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम