राऊतांची शिंदेंच्या शिवसेनेवर घणाघाती टीका म्हणाले बाप…

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १४ मार्च २०२३ । राज्यातील शिंदे व ठाकरे गटातील संघर्ष कुठेही थांबण्याचे नाव घेत नसताना शिंदे गटाच्या शिवसेनेत अनेक नेत्यासह कार्यकर्ते प्रवेश करीत असल्याने ठाकरे गटाच्या जिव्हारी हि गोष्ट चांगलीच लागली असल्याने आज संजय राऊत यांनी शिंदे गटावर घणाघाती टीका केली आहे.

शिंदे मिंधे गट पूर्वी बाप पळवत होते आता मुलं पळवायला लागलेत अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांचे पूत्र भूषण देसाई यांच्या शिंदे गटातील प्रवेशावरून राऊतांनी टोला लगावला आहे. दरम्यान, गोरेगाव भाजपकडून भूषण देसाई यांना विरोध करण्यात आला आहे.

भूषण देसाई यांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश झाला. यावरुन विविध राजकीय चर्चा सुरु असताना खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर टीकास्र सोडले आहे. सुभाष देसाई हे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आहेत. पण त्यांचा मुलगा हा शिवसेनेत नव्हता. काल सुभाष देसाईंनी निवदेन जारी करत भूषण देसाई हे शिवसेनेचे सदस्य नव्हते, हे स्पष्ट केले आहे. पण मिंधे गट कधी बाप पळवतात. आता मुलंही पळवायला लागले आहेत. त्यांची ही मेगा भरती सुरु आहे, ती कुचकामी आहे, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काही महिन्यांपूर्वी भूषण देसाई यांच्यावर आरोप केले होते. त्यांच्या चौकशीचे आम्ही आदेश दिले आहेत, असेही त्यांनी सांगितलं होते. मात्र, त्यांनी आता भूषण देसाई यांना भाजपाच्या वाशिंगमशीनमध्ये टाकून आपल्या बाजुला बसवले आहे. ही भाजपाच्या वाशिंगमशीनची कमाल आहे. मग उदय सामंत यांच्या आरोपांचं काय, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केलाय.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम