राऊतांची जीभ घसरली ; ठाकरेंच्या सभेवर बोलतांना !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २६ मार्च २०२३ ।  शिवसेना पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे हे प्रथमच आज मालेगावात येत आहे. त्यामुळे त्यांच्या सभेची जोरदार तयारी करण्यात आली आहे. सभे ठिकाणी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून उत्तर महाराष्ट्रातून लाखो शिवसैनिक सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सभास्थळी एक लाख खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. दरम्यान या सभेत उद्धव ठाकरे देशात सुरू असलेल्या राजकीय परिस्थीतीवर काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. या दरम्यान सभेविषयी बोलताना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांची जीभ घसरल्याचे पाहायला मिळाले.

उद्धव ठाकरेंच्या या सभेविषयी बोलताना राऊत म्हणाले, मालेगावच्या सभेकडे संपूर्ण राज्याचे नाहीतर देशाचे लक्ष लागले आहे. मला आताच दिल्लीच्या काही नेत्यांचे फोन आले. सगळीकडे सभेची चर्चा आहे. देशात आणि महाराष्ट्रात जे सुरु आहे त्यावर उद्धव साहेब काय बोलतील याकडे सर्वांच लक्ष आहे.

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, स्वतः मी आणि विनायक राऊतसाहेब या सभेचे काम पाहत आहे. रेकॉर्ड ब्रेक शब्द हा कमी पडेल अशी सभा होईल आणि इथे भाड्याने कोणी येणार नाही. दीडशे रुपये भाड्याने देऊन कोणी येणार नाही. असे लोक येतात आणि समोर प्रमुख भाषणं सुरू झाली की निघून जातात. या सभेसाठी काही संस्थानी सुट्या दिल्या आहेत असे देखील राऊत यांनी सांगितले. मालेगावात उद्धव ठाकरे यांचे उर्दू भाषेतील पोस्टरवर बोलताना राऊत म्हणाले की, देशात उर्दू भाषा नाही का? त्यांनी जावेद अख्तर यांनी पाकिस्तानमध्ये जाऊन केलेल्या वक्तव्याचे देखील कौतूक केले. भाषेच्या संदर्भात चित्त विचलित करू नका, लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे. माझ्या भाषेत सांगायचं झालं तर या सभेमुळे लोकांची हात भर फाटली आहे, अशा शब्दात त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम