विजेचा धक्का लागल्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

कुसुंबा खुर्द येथील घटना

बातमी शेअर करा...

विजेचा धक्का लागल्याने सेवानिवृत्त अधिकाऱ्याचा मृत्यू

कुसुंबा खुर्द येथील घटना

रावेर प्रतिनिधी

 

विजेचा शॉक लागून मंत्रालयातील सेवानिवृत्त आरोग्य अव्वल सचिव यांचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जमशेर समशेर तडवी (वय ६२, रा. कुसुंबा खुर्द) असे मयत अधिकाऱ्यांचे नाव आहे .

सकाळी १० वाजताच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरी घडली. ते घराच्या समोरील व्हरांड्यात उभे असताना लोखंडी अँगलला स्पर्श झाला, त्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार शॉक बसला बसल्याने खाली कोसळले. त्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती राजू गुलशेर तडवी यांनी रावेर पोलीस ठाण्यात दिली. त्यानुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास हेड कॉन्स्टेबल सिकंदर तडवी करीत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम