रवी राणांना आवर घालावा ; मंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ ऑक्टोबर २०२२ ।  राज्यात विदर्भातील वाद आता राज्यभर पसरल्याने शिंदे गटाची चांगलीच नाचक्की होत आहे. रवी राणा हे अपक्ष जरी आमदार असले तरी त्यांनी भाजपला पाठींबा दिल्याने ते सध्या तरी भाजपचेच आहे असे म्हणणे उचित ठरेल, तर बच्चू कडू व रवी राणा यांच्यामध्ये जे वाक्ययुद्ध सुरु आहे, त्याचे पडघम आता राज्यात वाजू लागले आहे,

“तुमच्या जिल्ह्याच्या वादामुळे राज्याच्या 40 आमदारांची बदनामी करण्याची गरज नाही, एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे असा होतो, त्यामुळे रणी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे, कोणी विकावू नाही या गोष्टीचा अभ्यास देखील त्यांनी केला पाहिजे. त्यासोबतच रवी राणांना आवर घालावा” असे मत शिंदे गटाचे नेते आणि पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले. जळगाव येथे ते माध्यमांशी बोलत होते.

बच्चू कडू आणि रवी राणा यांची लढाई आरपारची असल्याचे बोलले जात आहे. त्यावर बोलताना पाटील म्हणाले की, “मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बच्चू कडू यांची समज घातली पाहिजे आणि या विषयाचा पडदा पाडला पाहिजे. एका व्यक्तीवर आरोप करणे म्हणजे सगळ्यांवर आरोप करणे असे मला वाटते, त्यामुळे रवी राणा यांनी आपला शब्द मागे घेतला पाहिजे” असे आवाहन गुलाबराव पाटलांनी केले आहे.

रवी राणा यांनी आपले शब्द मागे घेतले नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल आणि संभ्रम निर्माण होईल. 40 वर्षाचं करिअर लावून लोकं तुमच्यासोबत मैदानात उतरले आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना आवर घालावा. तसेच दोघांनाही शांतेत बसवावे ही आमची प्रार्थना असल्याचेही पाटील म्हणाले.

अंतर्गत संघर्ष पेटणार?
बच्चू कडू यांनी गुवाहाटीला जाऊन खोके घेतले, असा आशयाचे वक्तव्य रवी राणा यांनी केले होते. रवी राणांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना बच्चू कडू यांनी देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही मध्ये ओढले. मी जर खोके घेतले असेन तर ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर करावे, असे जाहीर आव्हानच बच्चू कडू यांनी दिले होते. यानिमित्ताने भाजप आणि शिंदे गटातील अंतर्गत वादाला फोडणी मिळण्याची शक्यता आहे. फडणवीस यांच्याशी जवळीक असणाऱ्या रवी राणा यांच्या वक्तव्यामुळे शिंदे गटाच्या बंड हे पैसे आणि सत्तेच्या हव्यासापायी झाले होते, असा संदेश सामान्य जनतेमध्ये जाऊ शकतो. त्यामुळे बच्चू कडू यांच्याप्रमाणे शिंदे गटातील आमदारही रवी राणांच्या वक्तव्यावर आक्षेप नोंदवू शकतात. तसे झाल्यास शिंदे गट आणि भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे.

एक तारखेला बॉम्ब फोडणार?
बच्चू कडूंनी रवी राणांना आणि राज्य सरकारलाही एक नोव्हेंबरचा अल्टिमेटम दिला आहे. त्याआधी यासंदर्भात खुलासा करण्याचं किंवा पुरावे सादर करण्याचे आव्हान त्यांनी दिले आहे. “एक तारखेला राणाच्या बैठकीतले व्हिडीओ रिलीज करणार. कसे षडयंत्र रचले जाते ते सगळे समोर येईल. एक तारखेला ट्रेलर असेल. त्यानंतर चित्रपट 15 दिवसांनी पूर्ण होईल”, असे सूचक विधान बच्चू कडूंनी यावेळी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम