मुंडे – खडसे भेटीवर शिंदे गटाच्या आमदारांची प्रतिक्रिया !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जून २०२३ ।  राज्यातील भाजपचे दिग्गज महिला नेत्या असलेल्या पंकजा मुंडे गेल्या काही दिवसापासून आपल्या विधानामुळे चर्चेत आलेले असतांना आज थेट राष्ट्रवादीचे नेते आ.एकनाथ खडसे यांनी बंद दाराआड त्यांच्या सोबत चर्चा केल्यानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या चर्चा सुरु असतांना यावर आता शिंदे गटातील आमदारांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट म्हणाले कि, पंकजाताई आमच्याकडे आल्या तर स्वागतच असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यानंतर चर्चाला उधाण आलं आहे. नेमकं काय म्हटलं शिरसाट यांनी? पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे या सात- आठ महिन्यानंतर असे विधान करतच असतात, आणि त्यानंतर लगेचच त्या माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला अशी प्रतिक्रिया देतात. पंकजा मुंडे या वजनदार नेत्या आहेत.

सगळ्याच पक्षांना वाटते त्यांनी आपल्या पक्षात यावं. पंकजाताई आमच्याकडे आल्या तर त्याचं स्वागतच आहे. पण तसे होणार नाही, आम्हाला सोबत काम करायचं आहे. भाजप त्यांना भविष्यात योग्य जागा देईल असं शिरसाट यांनी म्हटलं आहे. अजित पवारांची प्रतिक्रिया दरम्यान या भेटीवर अजित पवार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.पंकजा मुंडे यांचा तो पक्षांतर्गत प्रश्न आहे, त्यावर बोलनं योग्य होणार नाही. मुंडे आणि खडसे यांनी अनेक वर्ष एकाच पक्षात काम केलं आहे. खडसे मुंडेसाहेबांना मानतात असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम