गिनीज बुकात नोंद : ७ मुलासह आई,वडिलांचा वाढदिवस एकाच दिवशी !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जुलै २०२३ ।  जगभरात अनेक रेकॉर्ड अनेकांच्या नावाने होत असतात काही ठरवून केलेले असतात तर काही रेकॉर्ड हे अचानक झालेले असतात असाच एक रेकॉर्ड पाकिस्तानमध्ये घडला आहे. लरकाना येथील एका कुटुंबाने वेगळाच रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे हा रेकॉर्ड कर्तृत्वापेक्षा नशिबानेच झाला आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. म्हणूनच, गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्यांची स्टोरी शेअर केलीय.

९ सदस्य असलेल्या या कुटुंबातील एक गोष्ट एकसमान आहे, ती म्हणजे सर्वांचा वाढदिवस एकाचदिवशी आहे. या कुटुंबातील सर्वच सदस्य १ ऑगस्ट रोजी जन्माला आले आहेत. त्यामुळे, या सगळ्यांचा वाढदिवस एकाच दिवशी कुटुंबात साजरा होतो.

पती-पत्नी आणि त्यांची ७ मुले एकाच दिवशी आपल्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन करतात. सर्वजण वेगवेगळ्या वर्षी जन्माला आले, पण त्याची जन्मतारीख आणि महिना एकच आहे. त्यामुळे, हा आता विश्वविक्रम बनला आहे. कारण, कुठल्याही कुटुंबातील एवढ्या सदस्यांचा जन्मदिवस एकाच दिवशी असल्याचे दुसरे उदाहरण नाही. यापूर्वी अमेरिकेतील कमिंस कुटुंबाच्या नावावर हे रेकॉर्ड होते, त्यांचा जन्मदिवस १९५२ आणि १९६६ साली झाला असून त्यांची जन्मतारीख २० फेब्रुवारी ही आहे. दरम्यान, आमीर आणि खुदेजा यांच्यासाठी १ ऑगस्ट ती तारीख आणखी स्पेशल आहे, कारण याच दिवशी दोघांचं लग्न झालं होतं. म्हणजे, दोघांच्या लग्नाचा वाढदिवसही याचदिवशी येतो. आपल्या सर्वात मोठ्या मुलीच्या जन्माच्या १ वर्ष अगोदर म्हणजेच १९९१ साली स्वत:च्या वाढदिवसादिवशी लग्न केले होते. त्यानंतर, १ ऑगस्ट १९९२ साली दोघांना पहिली मुलगी झाली, तिचं नाव सिंधु ठेवण्यात आलं. विशेष म्हणजे सिंधुंच्या जन्मावेळीच या दाम्पत्यास आश्चर्य आणि आनंद झाला होता. पण, त्यानंतर, त्यांच्या प्रत्येक मुलांचा जन्म हा १ ऑगस्ट या दिवशीच झाला. त्यामुळे, ही सर्व देवाची कृपा असल्याचं आमीर आणि खुदेजा म्हणतात. आमीर आणि खुदेजा यांची त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबतचे फोटो सध्या सोशल मीडियातून समोर आले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम