सालबर्डीत शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याबाबत : आ.खडसे यांची विधानपरिषद मध्ये मागणी
दै. बातमीदार । २८ जुलै २०२३ । सालबर्डी ता.मुक्ताईनगर येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याबाबत आ .एकनाथराव खडसे यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानपरिषद मध्ये मागणी केली यावेळी ते म्हणाले तारांकित प्रश्न क्रमांक १६१६७ ला दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात पशुसंवर्धन मंत्री यांनी पुढील बाबीचा खुलासा करावा महाराष्ट्र पशु व मत्स्य संवर्धन विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नाशिक विभागात एक तसेच जळगाव, अमरावती आणि अकोला विभागात एक याप्रमाणे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन मा.मंत्री, वित्त यांनी सन २०१६ मध्ये केली आहे, असे असल्यास, सालबर्डी (ता.मुक्ताईनागर, जि.जळगाव) येथील गट नं. ३३,३५,५५, ५६, व ५९ अशी एकूण ३३.७१ हे.आर. एवढी जमीन सदर महाविद्यालयाची स्थापनेसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर यांना उपलब्ध करून दिली आहे,
या अनुषंगाने सालबर्डी (ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव) येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे याला पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उत्तर दिले यावेळी ते म्हणाले महाराष्ट्र पशु व मत्स्य संवर्धन विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत नाशिक विभागात एक तसेच जळगाव, अमरावती आणि अकोला विभागात एक याप्रमाणे दोन नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालये स्थापन करण्याची घोषणा तत्कालीन मा.मंत्री, वित्त यांनी सन २०१६ मध्ये केली आहे, मौजे सालबर्डी (ता.मुक्ताईनगर, जि.जळगाव) येथे शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याऐवजी मौजे सावखेडा, ता.जि.जळगाव पशुवैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्याची कार्यवाही सुरु आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम