राहुल गांधी यांना दिलासा : नवीन पासपोर्ट मिळणार !
दै. बातमीदार । २६ मे २०२३ । कॉंग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी नवीन पासपोर्ट मिळवण्यासाठी दिल्ली न्यायालयात याचिका केली होती. दरम्यान या याचिकेला न्यायालयाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आता त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
ना हरकत प्रमाणपत्र (एनओसी) तीन वर्षांसाठी वैध असेल, असे न्यायालयाने म्हटले आहे. अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी वैभव मेहता यांनी गांधींच्या याचिकेला अंशतः परवानगी दिली. राहुल गांधी नवीन पासपोर्टसाठी एनओसीची गरज होती. याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होची यावर आज सुनावणी झाली. राहुल गांधी यांनी दहा वर्षासाठी एनओसीचा कालावधी वाढवून मागितला होता. मात्र न्यायालयाने राहुल गांधी यांना ३ वर्षासाठी एनओसी वैध असल्याचे म्हटले आहे. वकिलांच्या मते, न्यायालयाच्या निर्णयाचा अर्थ असा आहे की जर त्याला एनओसीची मुदत वाढवायची असेल तर त्याला तीन वर्षांनी पुन्हा न्यायालयात यावे लागेल.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम