सामान्यांना दिलासा : कच्च्या तेलासह पेट्रोल आणि डिझेलचे दराची घसरण

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३० ऑक्टोबर २०२२ । देशात सुरु असलेल्या महागाईने दिवाळीत डोकेवर काढले होते, पंरतु आज जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत काहीशी घसरण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शनिवारी ब्रेंट क्रूड 1.19 डॉलर्स (1.23 टक्के) खाली 95.77 डॉलर प्रति बॅरल आणि WTI 1.18 डॉलर (1.32 टक्के) प्रति बॅरल 87.90 डॉलर्सनी विकलं जात आहे. देशातील सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर जाहीर केले आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये इंधनाच्या किमतीत काहीसा बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे.

देशांतर्गत बाजारात पेट्रोल आणि डिझेलचे दर गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ समान पातळीवर कायम आहेत. शनिवारी सकाळी डब्ल्यूटीआय क्रूड प्रति बॅरल 87.46 डॉलरवर घसरल्याचं पाहायला मिळालं. तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 95.29 डॉलरपर्यंत घसरलं. ओपेक देशांनी उत्पादनात कपात केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून क्रूडच्या किमती वाढल्या आहेत.

२२ मे रोजी देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांत बदल
ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये कच्चं तेल विक्रमी पातळीवर आलं. पण त्यावेळीही देशांतर्गत बाजारात पेट्रोल-डिझेलच्या दरांत कोणताही बदल झालेला दिसला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत यापूर्वी शेवटचा बदल 22 मे रोजी झाला होता. पाच महिन्यांहून अधिक काळ पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर राहण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यावेळी केंद्र सरकारनं उत्पादन शुल्क कमी केलं होतं. उत्पादन शुल्कात कपात केल्यामुळं देशभरात पेट्रोल आणि डिझेल स्वस्त झालं. यानंतर महाराष्ट्रात तेलावरील व्हॅट कमी करण्यात आला, त्यामुळे किंमती खाली आल्या.

देशातील महानगरांत सध्याचे दर काय?
दिल्ली : पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर
मुंबई : पेट्रोलचा दर 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर
कोलकाता : पेट्रोल 106.03 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा 92.76 रुपये प्रति लिटर
चेन्नई : पेट्रोल 102.63 रुपये आणि डिझेल 94.24 रुपये प्रति लिटर

सरकारी तेल कंपन्या इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (IOCL), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) कच्च्या तेलाच्या किंमतीच्या आधारावर सकाळी 6 वाजता दररोज पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर करतात. पेट्रोल किंवा डिझेलच्या दरांत काही बदल झाल्यास त्यांची अंमलबजावणी त्याच वेळी केली जाते. वेगवेगळ्या राज्यांमध्ये व्हॅटचे दर वेगवेगळे असल्यामुळे, प्रत्येक राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर सारखे नसतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम