सरकारी कर्मचारीना दिलासा : महागाई भत्यात इतकी झाली वाढ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ मे २०२३ ।  देशभरात महागाई मोठ्या प्रमाणात वाढ होत असतांना आता सरकारने कर्मचाऱ्यांना मोठा निर्णय घेतला आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 8 टक्के करण्यात आला आहे. ही वाढ गुजरात सरकारने केली आहे. गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी राज्यातील सर्व सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी ही मोठी वाढ केली आहे.

केंद्र सरकारने नुकतीच महागाई भत्त्यात वाढ करताना केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना 42 टक्के डीएचा लाभ दिला जात आहे. ही वाढ 1 जानेवारी 2023 पासून लागू होणार आहे.

 

राज्य सरकारने जारी केलेल्या आदेशात असे म्हटले आहे की याचा फायदा 9.50 लाख पेन्शनधारक आणि सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे. या वाढीमुळे राज्यातील कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दिलासा मिळणार असल्याचे भूपेंद्र पटेल यांनी सांगितले. राज्य सरकारने महागाई भत्त्यात एकाच वेळी दोनदा वाढ केली आहे.
महागाई भत्त्यात 8 टक्के वाढ दोन भागात विभागली गेली आहे. पहिली वाढ 1 जुलै 2022 पासून करण्यात आली आणि त्यात 4 टक्के वाढ झाली आहे. दुसरीकडे 1 जानेवारी 2023 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर दुसरी वाढ करण्यात आली असून त्यातही 4 टक्के वाढ झाली आहे. याचा अर्थ कर्मचाऱ्यांचा एकूण डीए 8 टक्क्यांनी वाढणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम