राष्ट्रवादीला दिलासा ; खासदारकी केली बहाल !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २९ मार्च २०२३ ।  देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आलेली असताना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. लक्षद्वीपचे राष्ट्रवादीचे खासदार मोहम्मद फैजल यांची खासदारकी पुन्हा बहाल करण्यात आली आहे. हत्येच्या गुन्ह्यात फैजल यांना दोषी ठरवण्यात आले होते. त्यामुळे त्यांची खासदारकी 11 जानेवारी रोजी काढून घेण्यात आली होती.

राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आलेले मोहम्मद फैजल यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. मात्र, त्यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीपूर्वीच लोकसभा सचिवालयाने त्यांच्या अपात्रतेचा आदेश मागे घेतला. त्यामुळे फैजल यांना पुन्हा खासदारकी बहाल करण्यात आली आहे.

हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी फैजल यांना दहा वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यानंतर फैजल यांना अपात्र ठरवण्यात आले. मात्र केरळ उच्च न्यायालयाने 25 जानेवारी रोजी त्यांच्या शिक्षेला स्थगिती दिली. लोकसभा सचिवालयाने 13 जानेवारी रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, कावरट्टी येथील सत्र न्यायालयाने हत्येचा प्रयत्नाच्या खटल्यात दोषी ठरवल्याच्या तारखेपासून (11 जानेवारी 2023) फैजल यांना लोकसभेच्या सदस्यत्वापासून अपात्र ठरविण्यात आले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम