प्रफुल्ल पटेलसह अन्य ९ आरोपींना दिलासा! मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणी उच्च न्यायालयाकडून गुन्हा रद्द

बातमी शेअर करा...

मुंबई : दादरा नगर हवेली येथील खासदार मोहन देलकर यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल करण्यात आलेला गुन्हा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने रद्द केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यासह अन्य नऊ अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

खासदार मोहन डेलकर मुंबईतील मरीन ड्राईव्ह येथील हॉटेल सी ग्रीन हॉलेटमध्ये २२ फेब्रुवारी रोजी पंख्याला लटकून आत्महत्या केली होती. दादरा-नगर हवेलीच्या खासदाराची मुंबईत आत्महत्या का केली, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. गुजराती भाषेत लिहिलेली सुसाईड नोटमध्ये राजकीय नेते, प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकाऱ्यांकडून सातत्याने मानसिक छळ होत असल्याचे लिहिले होते. काही व्यक्तींची नावेही चिठ्ठीत होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्याशिवाय या प्रकरणातील अन्य आरोपी आहेत- तत्कालीन जिल्हाधिकारी संदीप सिंह; शरद दराडे, तत्कालीन पोलीस अधीक्षक; तत्कालीन उपजिल्हाधिकारी अपूर्वा शर्मा; मनस्वी जैन, उपविभागीय अधिकारी; मनोज पटेल, पोलीस निरीक्षक (सिल्वासा); रोहित यादव (डीएनएच प्रशासकीय विभाग अधिकारी); राजकीय नेते फत्तेसिंग चौहान आणि दिलीप पटेल (सिल्वासाचे तलाठी). यांच्याविरोधात तपास करून मरीन ड्राईव्ह पोलिसांनी देलकारांचा मुलगा अभिनव यांच्या सांगण्यावरून तक्रार दाखल केली होती. कलम ३०६ (आत्महत्येसाठी प्रवृत्त करणे), ५०६ (गुन्हेगारी धमकी),३८९ (एखाद्या व्यक्तीला भीती दाखविणे) नुसार गुन्हा दाखल केला. आणि १२० ब (गुन्हेगारी कट) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्याच्या तरतुदींखाली गुन्हा ठेवण्यात आला. याविरोधात वरील सर्व नऊ आरोपींनी उच्च न्यायालयात धाव घेत गुन्हा रद्द करण्याची मागणी केली. तसेच आपल्याला या प्रकऱणात चुकीच्या पद्धतीने गोवण्यात आले असल्याचा दावाही कला. त्या याचिकांवर गुरुवारी न्या. प्रसन्न वराळे आणि न्या. एस. डी. कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली.सर्व पैलूंचा विचार करता, आम्हाला याचिकांमध्ये योग्यता आढळून येत आहे. कायद्याचा दुरुपयोग रोखण्यासाठी खटला रद्द करणे न्यायालयाला योग्य वाटत आहे, असेही खंडपीठाने पुढे नमूद केले आणि याचिकाकर्त्यांना दिलासा देत गुन्हा रद्द केला.

मोहन डेलकर (५८) हे १९८९ पासून दादरा आणि नगर हवेली लोकसभा मतदारसंघातील खासदार होते. ते दादरा आणि नगर हवेली येथून ७ वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. २००९ मध्ये ते काँग्रेस पक्षात दाखल झाले. परंतु २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिली आणि अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात उतरत मोठ्या मतांनी पुन्हा विजयी झाले होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम