समीर वानखेडे यांना दिलासा : अटक टळली मात्र अटी लादल्या !
दै. बातमीदार । २२ मे २०२३ । गेल्या काही वर्षापासून राज्यात नव्हे तर देशात समीर वानखेडे हे नाव चर्चेत आले आहे. बॉलीवूडचा किंग खान शाहरुख याच्या मुलाला अटक करणारे एनसीबीचे माजी अधिकारी यांच्या सुनावणीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई हायकोर्टानं वानखेडे यांना दिलासा दिला आहे. मुंबई कोर्टानं वानखेडे यांना अटकेपासून संरक्षण दिले आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार वानखेडे यांना ८ जुन पर्यत अटकेपासून संरक्षण देण्यात आले आहे. अटकेपासून संरक्षण देण्याचा कोर्टाचा आदेश कायम ठेवण्यात आला आहे. यासगळ्या सगळ्यात कोर्टानं काही अटी वानखेडे यांच्यासमोर ठेवल्या आहेत. त्या म्हणजे त्यांना यापुढे आर्यन खान प्रकरणाशी संबंधित कोणत्याही प्रकारचे व्हाट्स अप चॅट व्हायरल करता येणार नाही. यापूर्वी समीर वानखेडे यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुख आणि त्यांच्यातील चॅट हे व्हायरल केल्याचे सांगण्यात आले होते. त्यावर कोर्टानं त्यांना समज दिली आहे. समीर वानखेडे यांनी त्यांच्याकरिता पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. आपल्याला सोशल मीडियावरुन जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. अशातच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संरक्षण मिळावे, अशी मागणी वानखेडे यांनी कोर्टाकडे केली आहे. यापूर्वी वानखेडे यांनी माध्यमांना आर्यन खान केस प्रकरणातील काही गोष्टी शेयर केल्या होत्या. त्यानंतर वेगळ्याच चर्चांना उधाण आले होते. आता कोर्टानं त्याकडे लक्ष वेधले आहे.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम