महाशिवरात्रीचा उपवास करताहेत हे लक्षात ठेवा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ फेब्रुवारी २०२३ । शिवाची आराधना करण्याचा मोठा दिवस म्हणून महाशिवरात्री मानली जाते. यादिवशी बरेच लोक उपवास करतात आणि काहीजण भक्तीचा भाग म्हणून तर काहीजण पोटाला आराम देण्यासाठी उपवास करतात. बऱ्याच दिवसांनी उपवास केला तर काहींना डिहायड्रेश होतं तर काहींना विकनेस येतो. उपवासाचे चुकीचे परिणाम तब्येतीवर होऊ नयेत यासाठी उपवास करताना कोणती काळजी घ्यायची याबाबत आहारतज्ज्ञ अर्चना रायरीकर यांनी काही टिप्स दिल्या आहेत.

उपवासाचा त्रास होऊ नये साठी काही हेल्दी टिप्स
१) उपवासाच्या दिवशी खूप पाणी प्या
२) सब्जा पाणी, चिया सिड्सचे पाणी, धना जीरा पाणी, नारळ पाणी, लिंबू पाणी, साखर नसलेले पातळ ताक यांचा समावेश करा.
३) उकडलेले बटाटे किंवा रताळे, काकडी खा
४) काकडीचा रायता खाऊ शकता
५) भरपूर ताजी फळे खा
६) उपवासाच्या स्मूदीज खा
७) लाल भोपळ्याचा रायता खा
८) मेडिटेशनवर लक्ष केंद्रित करा कारण उपवास त्यासाठीच केला जातो.
९) मुख्य फोकस म्हणून अन्न असू नये.
१०) राजगीरा लाडू किंवा राजगेरा लाह्या खाऊ शकता.
११) ग्रीन टी, ब्लॅक कॉफी, हर्बल टी इ.

काकडी स्मूदी
काकडी आणि पुदिना किंवा तुळशीची पानं एकत्र करून स्मूदी बनवा. काकडी, पुदिना, लिंबाचा रस आणि आले, मीठ, पाण्यात मिसळा.

राजगिरा, खजूराचा हलवा
१/२ कप राजगिरा पफ घ्या, खजूर अर्धा कप मऊ बारीक चिरून घ्या, त्यात काजू, बदाम आणि भोपळ्याचे दाणे आणि टरबूजाचे दाणे घाला, काजू आणि बिया भाजून घ्या आणि सर्वकाही एकत्र करा. यात तुम्ही थोडी वेलची घालू शकता.

लाल भोपळ्याचं सूप
लाल भोपळा 100 ग्रॅम, 1 टीस्पून राजगिरा किंवा शिंगाडा पीठ, काळं मीठ, हिरवी मिरची, 1 टीस्पून तूप, आलं आणि जिरेची पेस्ट यासाठी तुम्हाला लागेल. लाल भोपळा प्रेशर कुकरमध्ये १-२ शिट्ट्या काढून शिजवा, थंड होऊ द्या आणि नंतर मिश्रण करा आणि तूप गरम करून त्यात हिरवी मिरची, आले आणि जिरेची पेस्ट घाला, भोपळा घालून १ चमचा मैदा घालून उकळा, वरून मीठ आणि कोथिंबीर घाला.

रताळ्याच्या रेसिपीज
रताळे उकळा, चिरून घ्या आणि तपकिरी होईपर्यंत थोडा वेळ भाजून घ्या, लाल मिरचीचे फ्लेक्स घाला. शेवटी कोथिंबीर आणि नारळाने सजवा.

उपवासाचं थालिपीठ
लाल भोपळा किसलेला 1 कप, 1 उकडलेला बटाटा, फक्त बटाटा आणि लाल भोपळा मिक्स करण्यासाठी राजगिरा पीठ घाला, हिरवी मिरची आणि आले पेस्ट, धणे घाला आणि फक्त 1 टीस्पून तूप घालून एक छोटी थालिपीठ रेसिपी बनवा. हिरव्या मिरच्या भाजून घ्या. मिक्सरमध्ये मिरच्या, कोथिंबीर आणि शेंगदाणे १ चमचा आणि जिरे घाला आणि मीठ आणि थालीपीठासारखी चटणी बनवा
रेड स्मूदी
नारळाचे दूध, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, खजूर आणि सब्जाच्या बिया यात तुम्ही वापरू शकता. भोपळ्याच्या बिया, मखना, फळे, थोडे बदाम, 1-2 अक्रोड, खजूर, मनुका यांसारख्या बिया मिसळून उपवासाची स्मूदी तयार होईल.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम