प्रसिद्ध पत्रकार-लेखक तारेक फतेह यांचे निधन

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ एप्रिल २०२३ ।  गेल्या अनेक दिवसांपासून आजाराने ग्रस्त असेलेले प्रसिद्ध पाकिस्तानीपत्रकार आणि लेखक तारेक फतेह यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी निधन झाले. त्यांची मुलगी नताशा फतेह हिनेच ट्विटरवरुन त्यांच्या मृत्यूची माहिती दिली. त्यांच्यावर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण, आज अखेर त्यांची प्राणज्योत मालवली.

तारेक फतेह यांच्या मुलीने तारेक यांचे अनेक फोटो ट्विटरवर शेअर केले आहेत. यासोबत ट्विट केले की, ‘पंजाबचा सिंह, भारताचा सुपुत्र, कॅनेडाचा प्रियकर, सत्य बोलणारा, न्यायासाठी लढणारा, शोषित-वंचितांचा आवाज असलेले तारेक फतेह यांनी आपली मोहीम पुढे नेली आहे. त्यांची क्रांती त्यांना ओळखणाऱ्या आणि प्रेम करणाऱ्या सर्वांसोबत जिवंत राहील.’

 

 

याआधी शुक्रवारीही तारेख यांच्या निधनाची अफवा पसरली होती. त्यानंतर लोकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यासही सुरुवात केली. तारेक फतेह काही वेळातच ट्विटरवर ट्रेंड करू लागले. मात्र, तारेक यांच्या जवळच्या लोकांनी त्या वृत्तांचे खंडन केले होते. पण आज त्यांचे निधन झाले असून, स्वतः त्यांच्या मुलीनेच या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम