सरकार राज्यात दंगली घडवल्या जाताय ; पवारांचा आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जून २०२३ ।  राज्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे व भाजपची सत्ता आहे. यावर अनेक विरोधकांनी टीकास्त्र नेहमीच सोडत असतात. यावर आता राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी संवाद साधला.

शरद पवार म्हणाले कि, राज्यात वारंवार धार्मिक-जातीय तणावाच्या घटना घडत आहेत. कालच एक घटना संगमनेर येथे घडली तर दुसरी घटना कोल्हापूरला. या घटना जाणुनबुजून घडवल्या जात आहेत. राज्य सरकारच अशा घटनांना प्रोत्साहन देत आहे, असा थेट आरोप शरद पवार यांनी शिंदे-फडणवीसांवर केला. संगमनेर येथे दोन गटात झालेली दगडफेक तर कोल्हापुरात औरंगजेबाच्या फोटोवरून निर्माण झालेला तणाव या दोन्ही घटनांवर शरद पवारांनी परखड भाष्य केले.

शरद पवार म्हणाले, गेल्या काही दिवसांत दंगलीसदृश्य घटना घडल्या. मात्र, या घटना त्या-त्या परिसरातच मर्यादित राहिल्या. ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मात्र, हे जाणूनबुजून घडवले जात आहे. उदाहरणच घ्यायचे तर औरंगाबादमध्ये कोणी तरी औरंगजेबाचा फोटो दाखवला. तर, त्यावरून पुण्यात आंदोलन करायची काय गरज? पुण्यात कोणाला याविषयी पडले आहे. मात्र, सत्ताधाऱ्यांकडून आणखी तणाव निर्माण कसा होईल, हे पाहिले जात आहे. शरद पवार म्हणाले, काल राज्यात संगमनेर व कोल्हापूर येथे पुन्हा सामाजिक तणावाच्या घटना घडल्या. कोणीतरी मोबाईलवर मॅसेज पाठवतो. त्यावरुन लगेच रस्त्यावर उतरुन अशा घटनेला धार्मिक स्वरुप देणे योग्य नाही. सत्ताधाऱ्यांनी अशा गोष्टीला प्रोत्साहीत करणे योग्य नाही. दोन समाजात, दोन जातींमध्ये कटुता निर्माण करून राजकारण करणे चांगली गोष्ट नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम