
दै. बातमीदार | 03 सप्टेंबर 2022 |जळगाव येथील रोटरी क्लब ऑफ जळगाव गोल्डसिटीने 15 गरजू युवतींना तीन दिवसीय मोफत सौंदर्य प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करुन आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न केला.
यात बेसिक मेकअप, हेअर स्टायलिंग, साडी ड्रॅपींग आहे. विषयी तनुजा व मानसी महाजन यांनी प्रशिक्षण दिले. युवतींना व्यवसायासाठी 1500 रुपयांचे मेकअप साहित्य व पार्लरचा नावाचा बोर्ड गोल्डसिटीतर्फे मोफत देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष सुनील आडवाणी, मानद सचिव निखिल चौधरी, प्रकल्प प्रमुख डॉ.अर्चना कोतकर, रेणू आडवाणी, रित आडवाणी, पूजा भुतडा, श्रद्धा मोहोता आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम