रोटरीक्लब अमळनेरचा पदग्रहण समारंभ सोहळा थाटात संपन्न रोटरी क्लब अमळनेरचा ६७ वा पदग्रहण सोहळा थाटात

advt office
बातमी शेअर करा...

संपन्न !

अमळनेर(अमळनेर) अमळनेर नगरीत सामाजिक सेवा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या रोटरी क्लब अमळनेरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण सभारंभ सोहळा बन्सीलाल पॅलेस येथे थाटात संपन्न झाला.
अमळनेर येथील रोटरी क्लबचे नूतन पदाधिकाऱ्यांचा पद्ग्रहण सोहळा प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री.निलेश चव्हाण, संभाजीनगर व सह-प्रांतपाल रो.नितीन अहिरराव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. मावळते अध्यक्ष रोटे. ऋषभ पारेख यांनी नूतन अध्यक्ष रोटे.किर्तीकुमार कोठारी यांच्याकडे पदभार सोपविला व मावळते सचिव रोटे प्रतीक जैन यांनी नूतन सचिव म्हणून रोटे.ताहा बुकवाला यांचे यांच्याकडे पदभार सोपविला.मावळते सचिव रो.प्रतीक जैन यांनी रोटरी क्लब अमळनेरच्या मागील वर्षीच्या अहवाल सादर केला. यावेळी नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. याप्रसंगी पी बी ए इंग्लिश मीडियम स्कूलचे
प्रिन्सिपल श्री देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली इंटरॅक्ट क्लबची स्थापना करण्यात आली.
नवनिर्वाचित अध्यक्ष रो. किर्तीकुमार कोठारी यांनी येणाऱ्या वर्षात ऑथोप्रेडीक लॅबोरेटरी, वृक्षारोपण आपल्या दारी, रोटरी उत्सव, एड्स प्रोटीन किट, इन्व्हरमेंट ऍम्बुलन्स, शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध सुविधा, कौशल्य विकास, बाल व माता संगोपन सहाय्यक प्रकल्प रोटरी उत्सव चे आयोजन आदी महत्त्वाकांक्षी उपक्रमराबवले जातील, असे सांगितले.
सह-प्रांतपाल रो.नितीन अहिराव यांनी प्रांतपाल रोटे.डॉ.आनंद झुनझुनवाला यांचा संदेश वाचून दाखविले. याप्रसंगी रोटे मकसूद बोहरी यांच्याद्वारे प्रसूत क्लब बुलेटीन” सेवाचक्र “चे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी दहावीत प्रथम आलेल्या कुमारी श्रद्धा संजय सोमवंशी हिला रोटरी क्लब अमळनेर तर्फे संगणक व धूर विरहित शेगडी भेट देण्यात आली.
प्रमुख पाहुणे श्री.निलेश चव्हाण यांनी आपली लिखित”ती ही एक दिवाळी होती” यांची सुप्रसिद्ध मराठी कविता यांनी वाचन केले व आपल्या संभाषण कौशल्याने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटे.अजय रोडगे, डॉ.प्रितम जैन यांनी केले कार्यक्रमाला लायन क्लब सदस्य, खाशी चे चेअरमन श्री. हरी भिका वाणी, व्हॉइस चेअरमन डॉक्टर अनिल शिंदे व याप्रसंगी जळगाव जिल्हा रोटरीचे सहसचिव रोटे योगेश भोळे, जळगाव वेस्ट क्लबचे व चोपडा रोटरी क्लब चे पदाधिकारी पत्रकार बंधू भगिनी, व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार प्रदर्शन नूतन सचिव रोटे ताहा बुकवाला यांनी केले.कार्यक्रमाच्या शेवटी सौ. वसुंधरा लांडगे यांनी पसायदान प्रस्तुत केले .

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम