रोटरी क्लब अमळनेर तर्फे एड्स सह जगणाऱ्या अनाथ मुलांना दिवाळी फराळ व सकस आहार व प्रोटीन सप्लीमेंट किट वाटप कार्यक्रम…

बातमी शेअर करा...

अमळनेर(आबिद शेख) रोटरी क्लब अमळनेर गेल्या दोन वर्षांपासून अमळनेर शहरातील एड्स सोबत जगणाऱ्या अनाथ मुलांसाठी आधार बहुद्देशीय संस्थेच्या माध्यमाने हा प्रकल्प राबवित आहे. यामध्ये बालगोपालांचे व तरुणांचे आरोग्य सुदृढ करण्यासाठी व त्यांचे जीवन सुकर करण्यासाठी रोटरी क्लब अमळनेर प्रयत्नशील आहे व त्याला योग्य असा प्रतिसाद ही मिळत आहे. या प्रसंगी रोटरी क्लब अमळनेर तर्फे प्रोटीन टीन किट दर महिन्याला वितरित केले जाते .या महिन्यात सुद्धा देण्यात आले होते व एक दात्या तर्फे दिवाळी सणानिमित्त फराळ व मिठाईचे सुद्धा वाटप करण्यात आले आणि प्रताप महाविद्यालय अमळनेरचे निवृत्त उपप्राचार्य श्री भूषण बिर्ला व सौ जयश्री बिर्ला यांच्यातर्फे कडधान्याचे पाकिटांचे वितरण करण्यात आले होते. सदर ३२ गरजूंनी ह्या प्रकल्पाचा लाभ घेतला.याप्रसंगी काही गरजूंना कपड्यांचे ही वाटप करण्यात आले होते.
याप्रसंगी रोटरी प्रेसिडेंट रोटे कीर्तीकुमार कोठारी क्लब सेक्रेटरी ताहा बुकवाला,रोटे मकसूद बोहरी, ‍ रोटे डॉ.जी एम पाटील, रोटे अभिजीत भांडारकर, रोटे ईश्वर सैनानी, रोटे देवेंद्र कोठारी, रोटे सौरभ जैन तर बहुउद्देशीय आधार संस्थे तर्फे अध्यक्ष डॉ भारती पाटील , रेणू प्रसाद कार्यकारी संचालक, अश्विनी भदाणे, संजय कापडे तौसीफ खान ,दीप्ती शिरसाठ, मयूर गायकवाड ,निकिता पाटील, पुनम पाटील, साधना बडगुजर, मीनाक्षी राणे आदींनी सदर प्रकल्प यशस्वी करण्याकरिता विशेष प्रयत्न केले अशी माहिती रोटरी पी. आर.ओ. मकसूद बोहरी कळवितात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम